शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:34 IST

‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन नितीन गडकरी यांचा सन्मान, इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटींची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर चालणार आहेत.

अकोला : आता गाड्यांमध्ये विदर्भात तयार केलेल्या बायो इथेनॉलचा वापर होत आहे. विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन तयार करून ७० रुपये प्रतिकिलो विक्री होऊ शकते. त्याच्या अधिक वापरामुळे भविष्यात कोणी पेट्रोल-डिझेलचा वापर करणार नाही. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल हद्दपार होईल. आता गहू, तांदूळ, मका लावून कोणी भविष्य बदलू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता नाही, ‘ऊर्जा’दाता बनण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ गुरुवारी पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे उपस्थित होते. कृषी विद्यापीठाकडून गडकरी यांना यावेळी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले.

गडकरी म्हणाले, इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटींची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर चालणार आहेत. विदर्भातील कापूस बांगलादेशात निर्यात करण्याची योजना बनविली असून, याकरिता विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णत: थांबविण्यासाठी विद्यापीठ मोठे सहकार्य करू शकते. 

‘विदर्भाचे शेतकरीही माल निर्यात करू शकतात!’ मुंबईसारखी भक्कम आर्थिक राजधानी असलेल्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात, हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी नोकरीच्या मागे न लागता, शेती विकासाला प्राध्यान्य देण्याची आवश्यकता आहे. जळगावातील शेतकरी पिकाची निर्यात करू शकतात. मग, विदर्भातील शेतकरी का करू शकत नाही. निर्यात करणाऱ्या शेती पिकांच्या दिशेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

टॅग्स :Petrolपेट्रोलNitin Gadkariनितीन गडकरी