शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपांवर मिळणार औषधे, भाज्या, किराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:50 IST

देशातील जवळपास ५५ हजार पेट्रोलपंप लवकरच सुपर मार्केट बनणार आहेत.

नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : देशातील जवळपास ५५ हजार पेट्रोलपंप लवकरच सुपर मार्केट बनणार आहेत. सरकार तेथे पेट्रोलियम उत्पादने आणि आॅटो सर्व्हिसेसशिवाय फळे, भाज्या, औषधे, किराणा सामान व विजेच्या वस्तू विकण्याची तयारी करीत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ५५ हजार पेट्रोलपंप जनसेवा केंद्रांची भूमिका पार पाडतील. तेथे जेनेरिक औषधे व फळे, भाज्या आणि विजेचे साहित्य उपलब्ध असेल. या सुपर मार्केटची सुरुवात विजेची बचत करणारे बल्ब, ट्युबलाइट आणि पंख्यांपासून होईल.धर्मेंद्र प्रधान आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील तीन पेट्रोलिमय कंपन्या आणि ऊर्जा मंत्रालयाची कंपनी एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) यांच्यात करार झाला आहे. पेट्रोलपंपांवर बल्बसाठी ७० रुपये, ट्युबलाइटसाठी २२० रुपये आणि पंख्यासाठी फक्त १,२०० रुपये द्यावे लागतील.पीयूष गोयल म्हणाले की, याची सुरुवात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील पेट्रोलपंपांपासून केली जाईल आणि टप्प्याटप्प्याने देशातील सर्व ५४ हजार ५०० पेट्रोल पंपांवर ही सेवा सुरू होईल. ही केंद्रे केवळ इंधनाची गरजच भागवतात, असे नसून शहर, महामार्ग आणि ग्रामीण क्षेत्रांत इतरही सुविधा देत असतात. यामुळे ईईएसएलची वीज बचत करणारी उत्पादने जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतील.ईईएसएल सरकारच्या दक्षता ऊर्जा कार्यक्रमाला लागू करणारी संस्था आहे. त्या अंतर्गत वीज वितरण कंपन्या आणि इतर रिटेल चेनसारख्या आॅनलाइन मार्केट प्लसच्या माध्यमातून एलईडी बल्ब आणि लाइटचे वितरण करतात.ईईएसएल ९ वॅटचे एलईडी बल्बला ३८ रुपये प्रति युनिटने विकत घेते. ईईएसएलने नुकतीच लंडनमधील बाजारात १० कोटी पौंडांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.>बाजारभावापेक्षा स्वस्तआतापर्यंत उज्ज्वला योजनेअंतर्गत २५.५ कोटी एलईडी बल्ब आणि ३०.६ लाखांपेक्षा जास्त ट्यूबलाइट लोकांच्या घरी पोहोचले आहेत, असे गोयल म्हणाले. विशेष म्हणजे बाजारात आधीच उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या तुलनेत या उत्पादनांचे भाव कमी असल्यामुळे उत्पादकांना आपले भाव कमी करावे लागले आहेत. त्याचा थेट लाभ ग्राहकांना झाला आहे.