शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तेरावा दिवसही धोक्याचा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 08:37 IST

इंधनाचे दर कमी करून मोदी सरकार चौथ्या वाढदिवशी दिलासा देईल, अशी आशा बाळगून बसलेल्या जनतेची निराशाच झाली आहे.

नवी दिल्लीः कर्नाटक निवडणुकीनंतर सुरू झालेलं पेट्रोल-डिझेल दरवाढीचं सत्र आज तेराव्या दिवशीही कायम राहिलंय आणि मोदी सरकार चौथ्या वाढदिवशी काहीतरी खूशखबर देईल, अशी आशा बाळगून बसलेल्या जनतेची निराशाच झाली आहे. पेट्रोलच्या दरात आज १३ पैशांची, तर डिझेलमध्ये १६ पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर ८५.७८ रुपये झाला आहे, तर डिझेल ७३.३९ रुपयांवर पोहोचलंय.

वाढता वाढता वाढतच चाललेल्या इंधनाच्या दरांमुळे जनतेच्या रागाचाही भडका उडण्याचा धसका घेऊन गेल्या दोन-चार दिवसांत केंद्रातील मोदी सरकारनं वेगानंच पावलं उचलल्याचं चित्र दिसत होतं. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले होते. त्यातच,  शुक्रवारी रशियानं खनिज तेल उत्पादनाबद्दलच्या भूमिकेत थोडी नरमाई आणल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चं तेल काहीसं स्वस्त झालं होतं. त्यामुळे आज - मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीदिनी आपल्याला 'काडीचा आधार' मिळू शकेल, असं सामान्यांना वाटत होतं. परंतु, तसं काही झालेलं नाही. 

असे वाढले राज्यातील पेट्रोलचे दर - 

१५ मे - ८२.७९ रुपये१६ मे - ८२.९४ रुपये१७ मे - ८३.१६ रुपये१८ मे - ८३.४५ रुपये१९ मे - ८३.७५ रुपये२० मे - ८४.०७ रुपये२१ मे - ८४.४० रुपये२२ मे - ८४.७० रुपये२३ मे - ८४.९९ रुपये२४ मे - ८५.२९ रुपये२५ मे - ८५.६५ रुपये२६ मे - ८५.७८ रुपये 

टॅग्स :Petrolपेट्रोल