शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

विमान इंधनाच्या तुलनेत पेट्रोल महाग!

By admin | Updated: January 21, 2015 23:55 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी घट झाल्यानंतर आता विमानापासून रस्त्यावरील चारचाकी वाहनांपर्यंत सर्वच इंधनांच्या किमतीमध्ये घट झाली आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी घट झाल्यानंतर आता विमानापासून रस्त्यावरील चारचाकी वाहनांपर्यंत सर्वच इंधनांच्या किमतीमध्ये घट झाली आहे. मात्र, इंधनाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी कराच्या जंजाळामुळे प्रथमच विमान इंधनाच्या किमती (एअर टर्बाइन फ्युअल) या पेट्रोलच्या किमतीपेक्षा कमी झाल्या असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.राजधानी दिल्लीत सध्या पेट्रोलच्या किमती ५८ रुपये ९१ पैसे इतक्या आहेत. तर विमान इंधनाची प्रति लीटर किंमत ५२ रुपये ४२ पैसे इतकी आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमती त्या प्रमाणात कमी केल्या. मात्र, याच परिस्थितीचा फायदा वित्तीय तूट भरून काढण्याच्या दृष्टीने करून घेण्यासाठी केंद्र सरकारने सरत्या तीन महिन्यांत चार वेळा उत्पादन शुल्कात वाढ केली. गेल्या तीन महिन्यांत उत्पादन शुल्कात ७ रुपये ७५ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे आता प्रति लीटर पेट्रोलकरिता १६ रुपये ९६ पैसे इतके उत्पादन शुल्क वसूल केले जाते. सलग नऊवेळा पेट्रोलच्या किमतीत कपात झाल्यानंतर आता पेट्रोलचे दर हे १४ रुपये ६९ पैशांनी कमी झाले आहेत. उत्पादन शुल्कात झालेली वाढ ही ग्राहकांच्या खिशातून कंपन्या जरी वसूल करत नसल्या तरी, त्यात वाढ झाली नसती तर पेट्रोलच्या किमती आणखी नऊ रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या असत्या.विशेष म्हणजे, केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांत चार वेळा उत्पादन शुल्कात वाढ केल्याने त्या कराचे प्रमाणही लीटरमागे विक्रमी झाले आहे. (प्रतिनिधी)४वाहनाच्या इंधनात सर्वाधिक शुद्ध इंधन हे विमानाकरिता वापरले जाते. विमान इंधनावर सध्या ८ टक्के उत्पादन शुल्क आकारले जाते. त्यात वाढ झालेली नाही. ४त्यामुळे सध्याच्या स्थितीत पेट्रोलच्या तुलनेत एटीएफच्या किमती प्रति लीटर तब्बल पाच-साडे पाच रुपयांनी कमी झाल्या आहेत.