शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

महागाईचा भडका, सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल, डिझेल आणखी २० रुपयांनी महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 08:08 IST

दरवाढीमुळे महागाई वाढणार असल्याने केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार

नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तब्बल १३७ दिवस स्थिर राहिलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मंगळवारी प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ झाली. तर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही ५० रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे महागाई वाढणार असल्याने केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे. दरम्यान, इंधनाच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत ३ लाख कोटींची भर पडली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर ४ नोव्हेंबरपासून स्थिर होते. तर जुलै ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान एलपीजीच्या किमतीत १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती उच्चांकी स्तरावर पोहोचल्या असतानाही निवडणुकीमुळे एलपीजी आणि पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या.३,३१,६२१ कोटी रुपये सरकारी तिजाेरीत झाले जमा चालू आर्थिक वर्षाच्या (एप्रिल-डिसेंबर) पहिल्या नऊ महिन्यांत (२०२१-२२) मध्ये पेट्रोलियम उत्पादनांवरील सीमा शुल्क आणि अबकारी कराच्या रूपात केंद्र सरकारचा अप्रत्यक्ष कर महसूल जवळपास २४ टक्क्यांनी वाढून ३,३१,६२१.०७ कोटी रुपये झाला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेल्या माहितीमुळे ही बाब समोर आली आहे.आणखी २० रुपयांनी महागणार?युद्धामुळे सध्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होत असून, ते सध्या ११६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. निवडणुकांमुळे १३७ दिवस दरवाढ न केल्याने तेल कंपन्यांना १५ ते २० रुपयांचा तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेल दर २० रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.विरोधकांकडून सरकारचे ‘उपहासात्मक अभिनंदन'देशात एलपीजी सिलिंडर १ हजार रुपये करण्याचे 'लक्ष्य' साध्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन. आता पेट्रोल व डिझेलच्या दरातही रोजचा 'विकास' होईल. मोदी सरकारच्या काळात केवळ परवडणाऱ्या गोष्टी म्हणजे जातीयवाद आणि द्वेष. बाकी सर्व महाग आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.दरवाढीचा राक्षस...देशातील ११ शहरांमध्ये सिलिंडरच्या किमती १ हजारच्या पुढे. बिहारमध्ये सिलिंडर सर्वात महाग. मिळतो १०४८ रुपयांना. १ वर्षात १३०.५० रुपयांनी महाग झाला सिलिंडरगॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन हटविण्यात आला आहे. आता सरकार सतत किमतीचा ‘विकास’ करेल. महागाईच्या महामारीबद्दल पंतप्रधानांना विचारा. ते म्हणतील थाळी वाजवा.        - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCrude Oilखनिज तेल