शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 21:43 IST

Petrol-Diesel Price : केंद्रीय पेट्रोलिय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

Petrol-Diesel Price :डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर भारतासह जगातील 70 टक्क्यांहून अधिक आयात करणाऱ्या देशांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही तसे संकेत दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर अमेरिका पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवेल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा अधिक होऊन भाव नियंत्रणात येतील. त्यामुळे जे देश आपल्या गरजेच्या 70 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतात, त्या देशांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकन तेलाचा पुरवठा वाढेलपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील नवीन प्रशासनाच्या तेल आणि वायूचे उत्पादन जास्तीत जास्त करण्याच्या योजना लक्षात घेता, जास्त प्रमाणात अमेरिकन तेल भारतात येण्याची शक्यता आहे. भारताला तेल पुरवठादारांची संख्या आधीच 27 वरून 39 पर्यंत वाढली आहे आणि जर आणखी तेल आले, तर भारत त्याचे स्वागत करेल.

तेल आणि वायू उत्पादन वाढवण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाच्या पावलांबद्दल विचारले असता पुरी म्हणाले की, जर तुम्ही मला विचाराल की, जास्तीचे अमेरिकन इंधन बाजारात येणार आहे का, तर माझे उत्तर होय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात इंधनाची अधिक खरेदी होण्याची दाट शक्यता आहे. 

तेलाच्या किमती कमी होण्याची चिन्हे पुरी पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या नवीन प्रशासनाच्या घोषणांवर भारत सरकार अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. ट्रम्प प्रशासनाने घेतलेले काही निर्णय अपेक्षित होते आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी प्रतीक्षा करण्याची गरज आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी अमेरिका, ब्राझील, गयाना, सुरीनाम आणि कॅनडा येथून अधिक तेलाची आवक झाल्याचा उल्लेख केला आणि किंमती कमी होण्याचे संकेतही दिले.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पCrude Oilखनिज तेल