शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Petrol, Diesel Price Cut: पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट 17 राज्यांनी घटवला, 'महागड्या' महाराष्ट्रात प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 06:49 IST

२ ते ७ रुपयांपर्यंत दर झाले कमी; भाजपेतर राज्यांचा मात्र अपवाद व्हॅट कमी केल्याने देशभरातील १७ राज्यांत पेट्रोल व डिझेल १२ ते १७ रुपयांहून अधिक स्वस्त होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात ५ ते १० रुपये कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यांनीही गुरुवारी मूल्यवर्धित कर (व्हॅट) २ ते ७ रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे संबंधित राज्यांतील वाहनचालक व शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मात्र व्हॅटसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. 

व्हॅट कमी केल्याने देशभरातील १७ राज्यांत पेट्रोलडिझेल १२ ते १७ रुपयांहून अधिक स्वस्त होणार आहे. केंद्राने इंधनाचे दर बुधवारी कमी केल्यानंतर गुरुवारी उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार, आसाम, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, पुडुच्चेरी यांनी व्हॅटमध्ये कपात जाहीर केली. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, कर्नाटकात ७ रुपये, तर उत्तराखंडमध्ये पेट्रोलवरील व्हॅट २ रुपयांनी कमी केला आहे. हरयाणात पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी स्वस्त होईल. बिहारमध्ये तसेच ओडिशाने व्हॅटमध्ये ३ रुपयांची कपात केली आहे. नवे दर लागू केल्यानंतर सर्वच राज्यांत इंधनाचे दर १०० रुपये प्रतिलिटरहून कमी होतील.

अबकारी कर लागू केल्यानंतरच्या इंधनावर व्हॅट लावला जातो. त्यामुळे एरवीही व्हॅटमध्ये कपात झालीच आहे. पेट्रोल ५.७० ते ६.३५ रुपये तर डिझेल ११.१६ ते १२.८८ रुपयांनी स्वस्त होईल. शिवाय वरील राज्यांनी व्हॅट कमी केला आहे. केंद्राने अबकारी करात आणखी कपात करावी, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले.

बिगरभाजपराज्यांचा निर्णय कधीहोणार?भाजपशासित राज्यांबरोबरच अन्य राज्येही व्हॅटमध्ये कपात करतील, असा अंदाज होता. पण महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांनी गुरुवारी कपात केली नाही. केरळने व्हॅट कमी न करण्याचा निर्णय घेतला असून, पश्चिम बंगालने विधानसभा निवडणुकीपूर्वीच व्हॅट २ रुपयांनी कमी केला हाेता.

महसूल घटणारइंधन स्वस्त केल्याने केंद्राच्या महसुलात दरमहा ८७०० काेटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. वर्षभरात हा आकडा १ लाख कोटींहून अधिक असेल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केंद्राने करातून १.७१ लाख काेटी कमावले. व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर अनेक राज्यांचा महसूल दीड ते दोन हजार कोटी रुपयांनी घटेल.

गुजरात, सिक्किम, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, मणिपूर, पुडुच्चेरी, मिझोरम, गोवा यांनी व्हॅट ७ रुपयांनी कमी केला आहे. ओडिशा, बिहार यांनी ३ रुपयांची घट केली असून, मध्य प्रदेशने ४ व अरुणाचलने ५.५ टक्के कपात केली आहे. उत्तराखंडने २ रुपये कपात केली असून, हरयाणा व उत्तर प्रदेशात पेट्रोल व डिझेल १२ रुपयांनी स्वस्त होईल.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल