शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हुश्श... पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची आशा पक्की, कच्च्या तेलाची किंमत घटली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 17:15 IST

तेलाच्या भडक्यानं होरपळलेल्या जनतेला दिलासा मिळणार

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलचे दर गेल्या 12 दिवसांपासून सतत वाढत असल्यानं सामान्य जनता हैराण झालीय. दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यात मोदी सरकार अपयशी ठरत असताना आता आंतरराष्ट्रीय बाजारातून एक चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रशियानं खनिज तेल उत्पादनाबद्दलच्या भूमिकेत थोडी नरमाई आणली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर थोडे कमी झाले. देशातील तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांनुसार पेट्रोल, डिझेलचे दर ठरवत असल्यानं याचा फायदा कोट्यवधी लोकांना होऊ शकतो. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल 44 सेंट्सनं स्वस्त झालं. त्यामुळे प्रति बॅरलचा दर 78.35 डॉलरवर आला. रशियाचे उर्जा मंत्री अॅलेक्झांडर नोवाक यांनी त्यांचे सौदी अरेबियाचे समकक्ष खालिद अल-फलिह यांच्याशी संवाद साधल्यानंतर खनिज तेलाच्या किमतींमध्ये घट झाली. खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठ्याच्या अटी थोड्या शिथिल करण्याबद्दल या दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. याचा परिणाम लगेचच खनिज तेलाच्या किमतींवर पाहायला मिळाला.गेल्या वर्षभरात खनिज तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. खनिज तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या (ओपेक) कठोर नियमांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठा कमी झाला होता. याशिवाय व्हेनेझुएलाही आर्थिक संकटात सापडल्यानं खनिज तेलाच्या किमतीनं विक्रमी उसळी घेतली. रशिया आणि सौदी अरेबियानं आंतरराष्ट्रीय तेल पुरवठ्याचे नियम शिथिल केल्यानं खनिज तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलचे दर कमी होऊन जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNarendra Modiनरेंद्र मोदीCrude Oilखनिज तेल