पेट्रोल ८२ आणि डिझेल ६१ पैशांनी महाग
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला दरकपातीचा ट्रेंड फिरवित सार्वजनिक तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. ऑगस्ट २०१४ नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे ८२ पैसे आणि डिझेलचे दर प्रति लिटरमागे ६१ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.
पेट्रोल ८२ आणि डिझेल ६१ पैशांनी महाग
नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला दरकपातीचा ट्रेंड फिरवित सार्वजनिक तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. ऑगस्ट २०१४ नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे ८२ पैसे आणि डिझेलचे दर प्रति लिटरमागे ६१ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या किमतीत सतत घट होत राहिल्याने सार्वजनिक तेल कंपन्यांनी मागील सहा महिन्यांत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त केले होते. रविवारच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ५७.३१ रुपये (आधीचा दर ५६.४९ रु.) आणि डिझेल प्रति लिटर ४६.६२ रुपये (आधीचा दर ४६.०१ रु.) दराने विकण्यात येईल, असे तेल कंपन्यांनी जाहीर केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात दहा वेळा आणि ऑक्टोबरपासून डिझेलच्या दरात सहा वेळा कपात करण्यात आली होती. या दहा वेळेच्या कपातीनंतर पेट्रोल १७.११ रुपयांनी आणि सहा वेळच्या कपातीनंतर डिझेल १२.९६ रुपयांनी स्वस्त झाले होते. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्यानंतरही सरकारने त्यावरील अबकारी शुल्कात मात्र वाढ केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमतीच्या घसरणीचा ट्रेंड कायम राहिल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी गेल्या ४ फेब्रुवारीला पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये अनुक्रमे २ रुपये ४२ पैसे व २ रुपये २५ रुपये इतकी कपात केली होती. (वृत्तसंस्था)