शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल, डिझेलचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 10:24 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होताच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या पुन्हा दरांमध्ये वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुका संपताच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच नवे वाढीव दर लागू झाले आहेत. मुंबईतील आजचा पेट्रोलचा प्रतिलीटर दर 82.94 रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलीटर 70.88 रुपये एवढा आहे. 

24 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते. कर्नाटक निवडणुकीच्या 19 दिवसांच्या काळात इंडियन ऑइल कंपनीनं इंधन दरवाढ रोखली होती. मात्र 12 मे रोजी मतदान झाल्यानंतर 14 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. 14 मे रोजी पेट्रोल प्रति लीटर 17 पैसे, तर डिझेल प्रति लीटर 21 पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी लगेचच दुसरी वाढ करण्यात आली. मंगळवारी पेट्रोलचे दर प्रतिलीटर 15 पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलीटर 23 पैशांनी वाढवण्यात आले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन आठवडे असताना पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते.  मात्र त्यानंतर गेले तीन आठवडे इंधनाच्या दरांमध्ये बदल झाला नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींप्रमाणे बदलत राहतात. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं मतदान होण्याच्या 19 दिवसांपासून या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. निवडणुकांचा प्रचार सुरू असताना लोकांवर ताण येऊ नये, म्हणून आम्ही दरवाढ करण्याचे टाळले आहे, असा न पटणारा खुलासा पेट्रोलियम सचिवांनी केला होता. 

दर आणखी भडकणार 

सूत्रांच्या माहितीनुसार, 25 एप्रिल ते 14 मे या काळात पेट्रोल आणि डिझेलची प्रतिबॅरल किंमत, तसंच वाहतूक खर्च यात अनुक्रमे 4.15 डॉलर व 3.94 डॉलर वाढ झाली आहे. हा वाढीव खर्च भरुन काढण्यासाठी कंपन्यांकडून इंधनाच्या दरात आणखी वाढ केली जाऊ शकते. 

 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Petrolपेट्रोलDieselडिझेल