शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना लसीच्या व्यावसायिक निर्यातीला परवानगी, केंद्राचा निर्णय; 'या' दोन देशांना पाठवण्यात आली ‘सीरम’ची लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:47 IST

ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची भारतातील सिरम इस्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे निर्मिती करण्यात येत आहे. या लसीची पहिली ऑर्डर ‘सिरम’ने ब्राझील आणि माेराेक्काे या देशांना पाठविली.

नवी दिल्ली : काेराेनाविरुद्धच्या लसीची व्यावसायिक निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून, शुक्रवारी दाेन देशांमध्ये लसींचे डाेस पाठविण्यात आल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली आहे. ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची भारतातील सिरम इस्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे निर्मिती करण्यात येत आहे. या लसीची पहिली ऑर्डर ‘सिरम’ने ब्राझील आणि माेराेक्काे या देशांना पाठविली. यासंदर्भात आराेग्य सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी सांगितले की, देशातील लसनिर्मिती क्षमतेचा मानवतेच्या दृष्टिकाेनातून सर्वांसाठी वापर करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिले हाेते. त्यानुसार लसीच्या व्यावसायिक विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. जगभरातून भारतामध्ये निर्मित लसींना  मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वप्रथम या आठवड्याच्या सुरुवातीला शेजारील नेपाळ, बांग्लादेश, भूतान आणि मालदीव या देशांना काही लसी माेफत पाठविण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर आता ब्राझील आणि माेराेक्काे या देशांसाठी लस पाठविण्यात आली आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका आणि साैदी अरबला लसी पाठविण्यात येतील. वाराणसीतील महिला कर्मचाऱ्याशी मोदींचा संवाद -वाराणसीत लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी या अभियानाची माहिती घेतली. कर्मचारी पुष्पा देवी यांना सर्वात प्रथम लस देण्यात आली होती. त्यांच्याशी मोदी यांनी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, मी स्वत:ला भाग्यवान मानते. मी सुरक्षित आहे. तामिळनाडूच्या मंत्र्यांनी घेतली लस -तामिळनाडूचे आरोग्यमंत्री विजयभास्कर यांनी शुक्रवारी कोवॅक्सिन लस घेतली. कोरोना लस सुरक्षित आहे की नाही, अशा संभ्रमात अनेक लोक असताना विजयभास्कर यांच्या कृतीने त्यांना लस घेण्यास प्रेरणा मिळणार आहे.

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष पुढील महिन्यात सादर -कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांचा अहवाल भारत बायोटेक कंपनी पुढील महिन्यात औषध महानियंत्रकांना सादर करण्याची शक्यता आहे. तिसरा टप्पा पूर्ण न करताच कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मान्यता दिल्याने या लसीच्या गुणवत्तेबद्दल काही डॉक्टर व सामान्य माणसांनीही शंका व्यक्त केली होती.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारBrazilब्राझीलmedicineऔषधंcorona virusकोरोना वायरस बातम्या