शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

मोदी सरकारच्या बाजूने जनतेचा विश्वास दर्शक ठराव

By admin | Updated: July 14, 2017 09:18 IST

प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिननं वेबसाइटवर एक यादी प्रसिद्ध केली आहे.

ऑनलाइन लोकमतन्यू यॉर्क, दि. 14 - कोणत्याही देशाच्या विकासासाठी जनतेचा सरकारवर विश्वास असणं महत्त्वाचं असतं. आर्थिक विकास, सरकारचे निर्णय व करासारख्या महत्त्वाच्या व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारवर विश्वास असणं ही बाब महत्त्वाची ठरते. जनता सरकारला किती स्थिर आणि विश्वसनीय समजते यावर लोकांचा सरकारवर असलेल्या विश्वास विषद होत असतो. त्याप्रमाणेच देशाचं सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी किती सक्षम आहे आणि जनतेला सुविधा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध असणंही गरजेचं असतं. प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिननं वेबसाइटवर एक यादी प्रसिद्ध केली आहे. जनतेला सरकारवर असलेल्या भरोशाच्या बाबतीत यादीमध्ये भारताला अव्वल स्थान देण्यात आलं आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटकडून जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये 15 देशांची नावं देण्यात आली आहे. या यादीत भारताला पहिल्या क्रमांकाचं स्थान बहाल करण्यात आलं असून, ग्रीसला शेवटच्या स्थानी संधी मिळाली आहे. यादीनुसार भारताच्या सर्वाधिक 73 टक्के लोकांनी देशाच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. तर कॅनडातील 62 टक्के लोकांचा सरकारवर विश्वास आहे. कॅनडाला दुसरं स्थान मिळालं आहे. तुर्कस्थान आणि रशियाला यादीत तिस-या आणि चौथ्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशातील 58 टक्के लोकांनी सरकारवर भरोसा दाखवला आहे. युरोपिय देश जर्मनीत 55 टक्के, तर दक्षिण आफ्रिकेत 48 टक्के लोकांनी सरकारच्या कारभारावर समाधान व्यक्त केलं आहे. 45 टक्के लोकांनी भरोसा दाखवल्यामुळे ऑस्ट्रेलिया सातव्या स्थानी, तर 41 टक्के लोकांच्या विश्वासार्हतेमुळे ब्रिटेननं आठव्या स्थानी झेप घेतली आहे. जपानमध्ये फक्त 36 टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत. विशेष म्हणजे लोकशाही मानणारा आणि जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला यादीत दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. 

आणखी वाचा(2026 पर्यंत भारत सर्वांत मोठा दूध उत्पादक देश)अमेरिकेत फक्त 30 टक्के लोकांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे. स्पेननं 11व्या स्थानी, फ्रान्सनं 12व्या स्थानी जागा मिळवली आहे. ब्राझील, दक्षिण कोरिया आणि ग्रीसला क्रमशः 13व्या, 14व्या आणि 15व्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. ग्रीसमध्ये फक्त 13 टक्के लोकांनी सरकारवर भरोसा दाखवला आहे.