शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील..."; असदुद्दीन ओवेसी अरविंद केजरीवालांवर एवढे का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:22 IST

असदुद्दीन ओवेसी हे ओखला मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा-उर-रहमान यांच्या प्रचारासाठी आले होते......

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचा पारा सातत्याने वर-वर जाताना दिसत आहे. येथे दोन जागांवर निवडणूक लढवत असलेल्या ऑल इंडिया मजली-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी रात्री ओखला येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट निशाणा साधला. तसेच, त्यांना ओखलाच्या रस्त्यावरून फिरण्याचे आव्हान देत, लोक त्यांच्यावर चपला फेकतील, असे म्हटले आहे.

असदुद्दीन ओवेसी हे ओखला मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा-उर-रहमान यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी ओखलातील वाईट स्थितीवरून केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, आपण येथील रस्त्यांची वाईट अवस्था बघितली. अरविंद केजरीवाल यांनीही बघावी. केजरीवाल १० वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत, सर्वत्र विकास होत आहे. मग येथे विकास का झाला नाही? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.

ओवेसी पुढे म्हणाले, "आज मी येथील रस्त्यांवर फिरलो, आण १० मिनिटे चालून दाखवा. माझ्यावर फुलांचा वर्षाव झाला, येथील लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील. येथे प्रचंड खड्डे आहेत, घाण आहे आणि ना साफसफाईची कोणतीही व्यवस्था आहे. १० वर्षांपासून बाजा वाजवत आहेत."

"आम आदमी पक्षाचे नेते, भाजप जिंकेल, अशी भीती लोकांन  दाखवत आहेत. मात्र, ओखलातून सातत्याने अल्पसंख्याक उमेदवारच जिंकत आला आहे आणि यावेळी शिफाच विजयी होतील. ओखलाची व्होटर लिस्ट मी तुमच्या तोंडावर फेकून सांगतो की, येथून शिपच जिंकेल. तुम्ही, भाजप जिंके अशी भीती दाखवू नका. माला माहीत आहे की, तुमच्याच मनात भिती निर्माण झाली आहे," असेही ओवेसी या वेळी म्हणाले..

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Arvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूक 2024AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी