शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

पाक सीमेवरील लोक म्हणतात, ड्रग्जपासून हवी मुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 11:15 IST

गंगानगर जिल्ह्यात ‘उडता पंजाब’सारखी स्थिती; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मतदारांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगंगानगर : रमेश कुमारने बिकानेरमध्ये काम करत असताना हेरॉइनचे इंजेक्शन घेण्यास सुरुवात केली आणि तब्बल पाच वर्षे तो या नशेच्या पूर्णपणे आहारी गेला होता. कुमार आता हेरॉइनच्या व्यसनाच्या अथांग खोलीतून कसाबसा बाहेर आला असून, जीवनाची घडी बसवण्याचा प्रयत्न करीत आहे.सीमेपलीकडून जिल्ह्यात आणल्या जाणाऱ्या अमली पदार्थांना बळी पडून गंगानगरमध्ये कुमार यांच्यासारखे अनेकजण आहेत, जे बरे होण्याच्या आशेने व्यसनमुक्ती केंद्रात गर्दी करतात.

राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या गंगानगर जिल्ह्यातील स्थानिक लोक अमली पदार्थांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी लावून धरत आहेत. पुनर्वसन केंद्रात उपचार घेत असलेल्या कुमार यांनी सरकारला जिल्ह्यातील अमली पदार्थांचे सेवन संपवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

एका महिन्यात २५० ते ३०० रुग्ण पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी येतात, परंतु त्यापैकी मर्यादित खाटांमुळे केवळ १५ रुग्णांना एका वेळी दाखल केले जाऊ शकते. त्यापैकी बहुतांश गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यातील आहेत. आम्ही सरकारची मदत मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत.- डॉ. मनीषा बागला, प्रभारी, जनसेवा रुग्णालय पुनर्वसन केंद्र, गंगानगर

सवाई माधोपूरमध्ये त्रिकोणी लढतरणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या राजस्थानच्या सवाई माधोपूर मतदारसंघात पर्यावरण किंवा त्यासंदर्भातील समस्या नव्हे तर जातीय समीकरणे निर्णायक घटक आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार किरोडीलाल मीणा व काँग्रेसचे विद्यमान आमदार दानिश अबरार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. भाजपच्या बंडखोर आशा मीणा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानDrugsअमली पदार्थ