शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील लोक भूमिका घेत नाहीत म्हणून पानसरे व दाभोलकरांसारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या- गुलजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:21 IST

गेल्या काही वर्षांत मुंबईतील बुद्धिवंतांच्या मानसिकतेत फरक पडला आहे.

मुंबई: पश्चिम बंगालमधील उच्चभ्रू बुद्धिवंतांप्रमाणे महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रात परखड विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची हत्या झाली, असे मत ज्येष्ठ गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी व्यक्त केले. 'द वॉल' ला दिलेल्या मुलाखतीत गुलजार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येसंदर्भात भाष्य केले. गुलजार यांनी पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतील विचारवंतांच्या मानसिकतेवर बोट ठेवले. पश्चिम बंगालमध्ये एखादी घटना घडल्यानंतर तेथील विचारवंत त्यावर व्यक्त होतात. त्याला प्रादेशिक प्रसारमाध्यमेही प्रसिद्धी देतात. त्यामुळे राज्यातील जनतेला या विचारवंताविषयी माहिती असते. मात्र, महाराष्ट्रातील लोक एखाद्या घटनेनंतर फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असताना कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्यासारखे विचारवंत परखडपणे बोलतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. हे सहन न झाल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे गुलजार यांनी सांगितले. 

याशिवाय गुलजार यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षांत मुंबईतील बुद्धिवंतांच्या मानसिकतेत फरक पडला आहे. सध्या मुंबईतील विशिष्ट वर्ग इंग्रजी वर्तमानपत्रे किंवा नियतकालिके वाचतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथील वर्तमानपत्रांमध्ये मुख्यत: व्यापाराशी आणि जाहिरातींशी निगडीत मजकूर असतो. त्यामुळे इतर बातम्यांना वर्तमानपत्रांमध्ये क्वचितच स्थान मिळते. याउलट मराठी आणि हिंदीतील प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये जनआंदोलनाच्या बातम्या छापून येत असतात. मात्र, बहुतांश लोक ही वर्तमानपत्रे वाचतच नसल्यामुळे त्यांना या घटनांबद्दल माहितीच नसते, असे गुलजार यांनी म्हटले. 

टॅग्स :gulzarगुलजारGovind Pansareगोविंद पानसरेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर