जळगाव : मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. जनताच त्यांना जागा दाखवेल असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राज्याचा समृद्ध विकासावर राष्ट्रवादीचा भर असल्याचे खान्देशात रविवारी आयोजित विविध जाहीर सभांत बोलताना सांगितले.पवार म्हणाले, आघाडीच्या शासनात असताना पक्षाला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अडचणी येत होत्या. म्हणून राष्ट्रवादीच्या हाती संपूर्ण सत्ता द्या, शेतकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
मोदींकडून जनतेची दिशाभूल - पवार
By admin | Updated: October 6, 2014 04:21 IST