शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेमा खांडू : काँग्रेसमधून बंडखोरी, भाजपमधून मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 07:18 IST

पेमा खांडू यांनी यापूर्वीच त्यांच्या जागेवरून बिनविरोध निवडणूक जिंकली होती.

इटानगर  : अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळविला आहे. पेमा खांडू यांनी यापूर्वीच त्यांच्या जागेवरून बिनविरोध निवडणूक जिंकली होती. एकेकाळी काँग्रेसचे असलेले खांडू यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवतील.

वडिलांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन२१ ऑगस्ट १९७९ रोजी जन्मलेल्या खांडू यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील दोरजी खांडू हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. ३० एप्रिल २०११ रोजी तवांग मतदारसंघाच्या भेटीवर असताना एका हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले.हिंदू कॉलेजमधून पदवी घेतलेल्या खांडू यांनी २००० मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जिल्हास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध पदांवर काम केले. ३० जून २०११ रोजी प्रथमच ते मुक्तो मतदारसंघातून आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले. या जागेवर पूर्वी त्यांचे वडील आमदार होते. यानंतर पेमा खांडू यांचा अरुणाचल मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. २०१४ मध्ये त्यांनी पर्यटन आणि जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.  खेळांची आवड असलेल्या खांडू यांनी सत्तेत आल्यावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप प्रयत्न केले. 

भाजपचे दुसरे मुख्यमंत्रीत्यानंतर ते भाजपमध्ये गेले. गेगोंग अपांग यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे ते दुसरे मुख्यमंत्री बनले. यानंतर त्यांनी २०१९ मध्ये भाजपला विधानसभेत दणदणीत विजय मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. आता पुन्हा एकदा २०२४ मध्ये खांडू राज्याची धुरा सांभाळणार आहेत.

काँग्रेसमधून बंडखोरी करत बनविले सरकार१६ जुलै २०१६ रोजी त्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. खांडू यांची १७ जुलै २०१६ रोजी ३७ व्या वर्षी अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. पण दोन महिन्यांतच त्यांनी बंडखोरी केली. १६ सप्टेंबर रोजी, खांडू यांच्या नेतृत्वाखालील ४३ आमदारांनी काँग्रेसविरुद्ध बंड केले आणि भाजप आणि पीपीपीसोबत सरकार बनविले. 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेश