शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
3
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
4
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
5
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
6
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
7
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
8
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
9
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
10
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
11
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
13
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
14
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
15
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
16
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
17
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
18
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
19
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या

काश्मिरात शांतता

By admin | Updated: July 20, 2016 05:23 IST

काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता काश्मीर खोऱ्याने मंगळवारी ११ दिवसांनंतर प्रथमच शांतता अनुभवली.

श्रीनगर : काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता काश्मीर खोऱ्याने मंगळवारी ११ दिवसांनंतर प्रथमच शांतता अनुभवली. दुसरीकडे काजीगुंड घटनेबाबत लष्कराने तीव्र खेद व्यक्त करून चौकशीचे आदेश दिले आहेत. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी चकमकीत ठार झाल्यापासून खोऱ्यात हिंसाचार सुरू असून यात आतापर्यंत ४२ लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, राज्यात संचारबंदी सुरूच आहे. काजीगुंड येथे निदर्शकांनी सोमवारी लष्करी वाहनावर दगडफेक केली. तेव्हा सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन ठार तर निलोफर नावाच्या महिलेसह सहा जण जखमी झाले होते. उपचार सुरू असताना आज निलोफर यांचा मृत्यू झाला. लष्कराचे गस्ती पथक देवसरकडे जात होते. तेव्हा चुराहट काजीगुंड येथे लोकांनी रस्त्यावर अडथळे उभे केल्याचे पथकाला आढळून आले. जवान अडथळे हटवीत असताना काही समाजकंटकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू केली. वृत्तपत्र प्रकाशकांनी आज सलग पाचव्या दिवशी वृत्तपत्रे प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला. पीडीपी-भाजप सरकारने प्रसिद्धी माध्यमांवर निर्बंध लादले. तथापि, त्याची जबाबदारी स्वीकारण्यास ते तयार नाहीत तसेच हे दोन्ही पक्ष एकसुरात बोलत नसल्याच्या निषेधार्थ प्रकाशकांनी वृत्तपत्रे प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला. >अमरनाथ यात्रा पुन्हा सुरूकडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा येथील तळ छावणीहून मंगळवारी सायंकाळी पुन्हा सुरू झाली. परिस्थितीचा आढावा घेऊन यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी काश्मीर खोऱ्यातील दोन तळ छावण्यांहून २५९१ भाविकांचा जथा ६० वाहनांतून पवित्र गुंफेकडे रवाना झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.