शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी शांतता, सलोखा आवश्यक, पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:37 IST

देशाच्या विकासासाठी शांतता, सलोखा आणि ऐक्य पूर्वावश्यक आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना सामाजिक सद्भावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : देशाच्या विकासासाठी शांतता, सलोखा आणि ऐक्य पूर्वावश्यक आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना सामाजिक सद्भावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी अपरोक्षपणे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, स्वातंत्र्य आंदोलनात ‘वंदे मातरम’बद्दल आक्षेप घेण्यात आला होता, त्याचप्रमाणे ‘भारत माता की जय’ या जयघोषावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.काही लोकांना ‘भारत माता की जय’ बोलण्यास लाज वाटते, असे पंतप्रधान मोदी भाजप खासदारांच्या बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील दंगलीनंतर पक्षाच्या बैठकीत आपल्या पहिल्या भाषणात मोदी म्हणाले की, भाजपसाठी राष्टÑहित सर्वोच्च आहे, तर इतरांसाठी पक्षहित सर्वांत महत्त्वाचे आहे, असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.विकास हा आमचा मंत्र आहे आणि शांतता, सलोखा आणि एकता देशाच्या विकासाठी पूर्वावश्यक आहे. शांतता, सलोखा आणि एकतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यावर भर देताना पंतप्रधान मोदी यांनी पक्ष नेत्यांना मन, वाचा आणि कृतीने देशाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले. भारत माता की जय हा जयघोष मनात ठेवून त्यांनी देशाच्या विकासासाठी काम केले पाहिजे. कारण देशाचा विकास सर्वोच्च आहे, असेही ते म्हणल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या काही नेत्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे दिल्लीत दंगल भडकली, असा आरोप विरोधी पक्ष करीत असताना पंतप्रधानांनी शांतता, सलोखा आणि एकतेचे आवाहन केले. बैठकीत मोदी यांनी जनऔषधी केंद्राच्या फायद्यांचाही ठकळपणे उल्लेख करीत या लाभार्थ्यांशी ७ मार्च रोजी संवाद करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंह