शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: पीडीपीच्या खासदाराने फाडली राज्यघटना; तर एका सदस्याने स्वत:चा कुडता फाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 04:20 IST

खासदार नझीर अहमद लवाय यांनी भारतीय राज्यघटना फाडण्याचे अभद्र कृत्य केले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (पीडीपी) एक खासदार नझीर अहमद लवाय यांनी भारतीय राज्यघटना फाडण्याचे अभद्र कृत्य मंगळवारी केले; तर याच पक्षाचे एक खासदार मीर मोहम्मद फयाझ यांनी निषेध म्हणून स्वत:चा कुडता फाडून घेतला.हा प्रस्ताव राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, पीडीपी, भाकप, माकप, राजद, आप या पक्षांच्या खासदारांनी सभापतींच्या हौद्यामध्ये जमा होऊन धरणे धरले; तसेच मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. हा निषेध सुरू असताना पीडीपीचे खासदार नझीर अहमद लवाय यांनी भारतीय राज्यघटना फाडण्याचे कृत्य केल्याने सभागृह अवाक् झाले. भाजपचे खासदार विजय गोयल यांनी तत्काळ हौद्यामध्ये जाऊन लवाय यांच्या हातातून राज्यघटनेची प्रत काढून घेण्याचा प्रयत्न केला. लवाय यांना वाचविण्यासाठी काँग्रेसचे खासदार बी. के. हरिप्रसाद हेदेखील हौद्यामध्ये गेले.मार्शलद्वारे सभागृहाबाहेर काढलेप्रस्तावाचा विचित्र पद्धतीने निषेध करणाऱ्या पीडीपीच्या दोन्ही खासदारांना सभापती व्यंकय्या नायडू यांच्या आदेशानुसार मार्शलनी तत्काळ सभागृहाबाहेर काढले.राज्यघटना फाडण्याचे गैरकृत्य मी कोणालाही करू देणार नाही. तसे करणाºयावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही नायडू यांनी दिला आहे.सभागृहातून बाहेर काढण्यात आल्यानंतर लवाय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव हा काश्मीरची स्वतंत्र ओळख पुसून टाकण्याचा डाव आहे. त्याबद्दल मोदी सरकारचा पीडीपी तीव्र निषेध करते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370