पावणेदोन कोटींच्या खंडणीतील आरोपींचा पीसीआर
By admin | Updated: January 20, 2016 01:51 IST
सूत्रधार फरार : अनेकांचे धाबे दणाणले
पावणेदोन कोटींच्या खंडणीतील आरोपींचा पीसीआर
सूत्रधार फरार : अनेकांचे धाबे दणाणलेनागपूर : त्रिमूर्तिनगरातील कुख्यात बुकी अजय श्यामराव राऊत (वय ४५) याच्याकडून पावणेदोन कोटींची खंडणी उकळणाऱ्या तिघांना अटक करून गुन्हे शाखेने त्यांचा २७ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.आशिष नायडू, नितीन वाघमारे आणि कार्तिक तेवर अशी या खंडणीखोरांची नावे आहेत. राऊत याने २३ डिसेंबरला गुन्हे शाखेत दिलेल्या तक्रारीनुसार, १३ डिसेंबरला दुपारी १२ च्या सुमारास १० गुंडांनी त्याला इनोव्हा, तवेरासारख्या कारमध्ये कोंबले. पाच कोटींच्या खंडणीसाठी तब्बल दोन तास कारमध्ये फिरवून बेदम मारहाण केली. खंडणी न दिल्यास तुला आणि तुझ्या मुलांना जीवे ठार मारू, अशी धमकी दिल्यामुळे राऊतने राजू भद्रे, हरचंदानी आणि मुणोत या तिघांकडून पावणेदोन कोटी रुपये गोळा केले. ही रक्कम अपहरणकर्त्यांना देऊन राऊतने स्वत:ची सुटका करून घेतली. या प्रकरणाची कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा पाठपुरावा करून सोमवारी अखेर उपरोक्त तिघांना जेरबंद केले. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २७ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.--