शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिक्कीममध्ये दोन किंवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्यांना वेतनवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 06:02 IST

मूळ रहिवाशांची संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन

गंगटोक : सिक्कीम या राज्यातील मूळ रहिवाशांच्या लोकसंख्येत वाढ होण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी सिक्कीम सरकार आपल्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना दोन किंवा त्याहून अधिक अपत्ये आहेत, अशा लोकांना आगाऊ तसेच अतिरिक्त वेतनवाढ देणार आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२३पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार आहे.

या राज्याचे मूळ नागरिक असल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र ज्यांच्याकडे आहे, अशा सरकारी कर्मचाऱ्यांपैकी दोन  अपत्ये असलेल्यांना एक आगाऊ वेतनवाढ तर तीन अपत्ये असलेल्यांना दोन वेतनवाढ देण्यात येतील. ही माहिती सिक्कीमच्या कार्मिक खात्याचे सचिव रिंझिंग चेवांग भुतिया यांनी १० मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये दिली आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याचा जन्म १ जानेवारी २०२३ रोजी किंवा त्यानंतर झाला असेल, त्यांनाच वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. मूल दत्तक घेतलेल्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. (वृत्तसंस्था)

देशातील सर्वांत कमी जन्मदर सिक्कीममध्ये

 सिक्कीममधील मूळ रहिवाशांच्या समुदायात जन्मदराचे कमी झालेले प्रमाण वाढविण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी एक योजना राबविण्यात येणार असल्याचे तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते.

 मूळ रहिवाशांची घटत चाललेली संख्या हा त्या राज्यासाठी चिंतेचा विषय आहे. सिक्कीम हे भारतातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. तिथे सात लाख लोक राहतात.

 त्या राज्यात देशातील सर्वांत कमी जन्मदर असून त्याचे प्रमाण १.१ टक्के आहे. सिक्कीममध्ये लेपचा, भाटिया आणि नेपाळी या समुदायांतील लोक मूळ रहिवासी असून त्यांची लोकसंख्या वाढावी, म्हणून प्रयत्न सुरू आहेत.