शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

फी भरली नाही, तर शाळा विद्यार्थ्याला काढून टाकू शकते; कोलकाता उच्च न्यायालयाचा कठोर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:28 IST

न्या. आय. पी. मुखर्जी आणि न्या. मौसमी भट्टाचार्य यांच्या पीठाने स्पष्ट केले की, न्यायालयाने १३ ऑक्टोबर २०२० च्या आदेशानुसार पालक आणि शाळा यांच्यात एक संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याचे पालन झाले नाही. 

नागपूर : कोरोना काळात अनेक पालकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. मात्र, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे असे पालकही या परिस्थितीचा फायदा घेऊन फी भरत नाहीत, अशा शब्दांत फटकारत कोलकाता उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, फी न भरणाऱ्या विद्यार्थ्याला शाळा पूर्वसूचनेशिवाय काढून टाकू शकते. संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासच्या बाहेरही केले जाऊ शकते.न्या. आय. पी. मुखर्जी आणि न्या. मौसमी भट्टाचार्य यांच्या पीठाने स्पष्ट केले की, न्यायालयाने १३ ऑक्टोबर २०२० च्या आदेशानुसार पालक आणि शाळा यांच्यात एक संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याचे पालन झाले नाही. या आदेशात उच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की, शाळेच्या थकीत फीपैकी ५० टक्के रक्कम तीन आठवड्यांच्या आत जमा करा. या काळात फी न भरल्यास शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.  पालक आणि शाळा यांच्यात फीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या जनहित याचिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांना न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, १३ ऑक्टोबर २०२० च्या निर्णयानुसार मार्च २०२० नंतरच्या थकीत रकमेची माहिती पालकांना द्यावी. कोरोना संसर्ग काळात काही खासगी शाळांनी फी वाढविली. या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मागील वर्षी याबाबत तक्रार केली होती. उच्च न्यायालयाने एका आदेशात ८० टक्के फी भरण्याचे निर्देश दिले होते. निधी नसल्याने वेतन देण्यास शाळांना अडचणीया याचिकेवरील सुनावणीदरम्यान शाळांनी न्यायालयात सांगितले की, पालकांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. त्यांच्याकडे शाळांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. निधीच्या कमतरतेमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास शाळांना अडचणी येत आहेत. सध्या ऑनलाइन क्लास सुरू आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, असे अनेक पालक आहेत जे सरकारी सेवेत आहेत. त्यांच्या उत्पन्नावर काहीही परिणाम झाला नाही. मात्र, ते जाणूनबूजून फी देत नाहीत.