शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या थकीत फीपैकी ५०% तीन आठवड्यांत भरा; गैरफायदा घेणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 06:13 IST

थकित फीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

कोलकाता : शाळेच्या थकीत फीच्या ५० टक्के रक्कम पालकांनी तीन आठवड्यांच्या आत भरावी असा महत्वपूर्ण आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. जे पालक फी भरणार नाहीत, त्यांच्या मुलांना गुणपत्रिका देऊ नका असेही न्यायालयाने बजावले आहे.कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे अनेक पालकांना शाळेची पूर्ण फी भरणे शक्य झाले नव्हते. पण त्यामुळे शाळांचीही आर्थिक कोंडी झाली होती. जे विद्यार्थी दहावी, बारावीला होते, त्यांच्यापैकी ज्यांच्या पालकांनी शाळेची फी भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका देऊ नका असा आदेशही न्यायालयाने शिक्षण मंडळांना दिला आहे. थकित फीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.न्यायालयाने म्हटले आहे की, २०२० सालापेक्षा आता आर्थिक स्थिती सुधारली आहे.  मात्र या स्थितीचा गैरफायदा घेऊन अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची संपूर्ण फी भरलेलीच नाही. अशा थकित फीची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना साथीमुळे पगाराविनाच राहावे लागले अशी स्थिती उद्भवली नाही.  शाळेच्या फीमध्ये सवलत द्यावी किंवा फी कमी करावी अशा मागणीसाठी न्यायालयात पालकांनी याचिका दाखल केली होती. फी भरणे मुद्दाम टाळलेकोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले की, अनेक पालकांची शाळेची फी भरण्याची आर्थिक क्षमता आहे. पण त्यांनी मुद्दामहून हे पैसे भरणे टाळले आहे. शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या असून त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना पगार देण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत. शाळेच्या वास्तूच्या देखभालीचा खर्चही आहेच. विद्यार्थी व शाळा या दोघांच्या हिताचे संतुलन राखणे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी थकीत फी भरलीच पाहिजे.