कथा अभिवाचन स्पर्धेत पवन खंबायत प्रथम
By admin | Updated: April 5, 2016 00:13 IST
जळगाव- मिशन हेल्प फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या अभिवाचन स्पर्धेत पवन खंबायत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. एम.जे.डान्स अकॅडमी सभागृहात रविवारी नृत्य दिग्दर्शक गिरीश भोसले यांच्याहस्ते उद्घाटन झाले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे-
कथा अभिवाचन स्पर्धेत पवन खंबायत प्रथम
जळगाव- मिशन हेल्प फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या अभिवाचन स्पर्धेत पवन खंबायत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. एम.जे.डान्स अकॅडमी सभागृहात रविवारी नृत्य दिग्दर्शक गिरीश भोसले यांच्याहस्ते उद्घाटन झाले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे-द्वितीय- योगेश शर्मा, तृतीय- प्रदीप भोई, उत्तेजनार्थ जया बर्हाटे, उषा तायडे, मृण्मयी भावे, रुपेश खरे यांचा समावेश आहे. स्पर्धेत राज्यभरातील ४२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. पारितोषिक वितरण कवि भास्कर जुनागडे, मनसेचे उप शहर अध्यक्ष दिलीप सुरवाडे, मिशन हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक सोनवणे, कुलदीप परसे, यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक वाल्मीक जोशी यांनी केले. सूत्रसंचालन समाधान पाटील यांनी तर आभार अनघा सोनवणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अभिषेक जोशी, डॉ.सुषमा चौधरी, विक्रम कापडणे, रोहन भांडारकर यांनी परिश्रम घेतले.