शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भरडधान्यातून खाद्य सुरक्षेचा मार्ग - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 08:49 IST

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : खाद्य सुरक्षा आणि खानपानविषयक सवयींच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘भरडधान्ये’ उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. देशाच्या खाद्य टोपलीत या धान्यांची हिस्सेदारी वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञांना केले.

‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारताचे प्रयत्न आणि प्रस्तावामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. ही आपल्या देशासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भरडधान्यास जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत  सातत्याने प्रयत्न करत आहे. भरड धान्ये ही प्रतिकूल हवामानात तसेच रसायने व खते यांच्या वापराविना सहजपणे उत्पादित केली जाऊ शकतात. 

भरडधान्याचे प्रमाण ५ टक्केभारताच्या राष्ट्रीय खाद्य टोपलीत भरडधान्यांची हिस्सेदारी आज केवळ ५ ते ६ टक्के आहे. ही हिस्सेदारी वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मी भारताचे शास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञांना करतो. त्यासाठी साध्य करण्याजोगी उद्दिष्ट्ये आपल्याला निर्धारित करावी लागतील, असे मोदी म्हणाले.

शेतकरी हाेत आहे सक्षमभरडधान्याद्वारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेत आहे. देशात सुमारे २.५ काेटी शेतकरी प्रत्यक्षपणे भरडधान्याशी जुळलेले आहेत. त्यांना भरडधान्य मिशनचा लाभ होईल. यातून त्यांचे उत्पन्न वाढत असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत हाेईल, असे माेदी म्हणाले.

भरडधान्याचे सेवन वाढलेदेशात १२-१३ राज्यांमध्ये भरडधान्याचे उत्पादन हाेते. मात्र, त्यांचा वापर फार कमी हाेता. एक व्यक्ती महिनाभरात २ ते ३ किलाे भरडधान्य खायचा. आता हे प्रमाण दरमहा १४ किलाेवर गेले आहे.

टपाल तिकिटाचे अनावरण - राजधानी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या संकुलात ‘जागतिक श्री अन्न परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त काढण्यात आलेले ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३’ या विषयीचे टपाल तिकीट व नाण्यांचे अनावरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. - या परिषदेला १०० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. १९ मार्च रोजी परिषदेचा समारोप होणार आहे. भारत यंदाच्या जी-२० देशांच्या परिषदेचा यजमान आहे. त्याचे औचित्य साधून भारत सरकारने भरडधान्यांचा विषय जी-२० परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरही घेतला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी