शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Passport Ranking 2021: जपान आणि सिंगापूरचा पासपोर्ट आहे सर्वात पॉवरफुल; जाणून घ्या भारताचे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 16:01 IST

World Most Powerful Passport 2021 : जपान आणि सिंगापूरकडे सध्या जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्ट आहेत, तर पाकिस्तान आणि उत्तर कोरियाकडे सध्या जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट आहेत.

कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर, अनेक देशांनी त्यांच्या व्हिसा आणि पासपोर्टमध्ये अनेक बदल केले आहेत. या बदलांचा परिणाम त्यांच्या पासपोर्टवरही झाला आहे. दरम्यान, जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्टची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, जपान आणि सिंगापूरकडे सध्या जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्ट आहेत, तर पाकिस्तान आणि उत्तर कोरियाकडे सध्या जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट आहेत. (The world’s most powerful passports in 2021: Here is where India stands)

World Most Powerful Passport 2021 च्या रँकिंगनुसार, भारत बुर्किना फासो, ताजिकिस्तानसह 90 व्या स्थानावर आहे. हेनले अँड पार्टनर्सने जगातील पॉवरफुल देशाच्या पासपोर्टचे रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगनुसार, या देशांचे पासपोर्टधारक व्हिसाशिवाय 58 देशांमध्ये प्रवेश करू शकतात.

हेनले पासपोर्ट इंडेक्सने जगातील सर्व पासपोर्टला क्रमांक देते, जे पासपोर्टधारक व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात. मात्र, हेनले पासपोर्ट इंडेक्सने कोविड -19 मुळे जगातील अनेक देशांनी लादलेली तात्पुरती प्रवास बंदी विचारात घेतली नाही. 

हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार, जपान आणि सिंगापूरचा स्कोअर 192 आहे आणि ते सर्वात वर आहेत. याचा अर्थ असा की या देशांचे पासपोर्टधारक जगातील 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. त्याचवेळी, पाकिस्तान, इराक, येमेन, अफगाणिस्तान सारख्या देशांचे पासपोर्ट सर्वात कमी पॉवरफुल आहेत.

'हे' आहेत 10 पॉवरफुल पासपोर्ट असलेले देश- जपान, सिंगापूर (स्कोअर - 192)- जर्मनी, दक्षिण कोरिया (स्कोअर - 190)- फिनलँड, इटली, लक्समबर्ग, स्पेन (स्कोअर - 189)- ऑस्ट्रिया, डेन्मार्क (स्कोअर - 188)- फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वीडन (स्कोअर - 187)- बेल्जियम, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड (स्कोअर - 186)- चेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा, नॉर्वे, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स (स्कोअर - 185)-  ऑस्ट्रेलिया, कॅनडा (स्कोअर - 184)- हंगेरी (स्कोअर - 183)- लिथुआनिया, पोलंड, स्लोव्हाकिया (स्कोअर - 182)

टॅग्स :passportपासपोर्टJapanजपानsingaporeसिंगापूर