परपेच्युएल कॉन्व्हेंट दक्षिण गोवा जेता
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
मडगाव : नावेली येथील परपेच्युएल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुलींच्या संघाने अंतिम फेरीत मायणा-कुडतरीच्या सेंट रिटा हायस्कूल संघाचा 2-0 गोलने पराभव केला. याबरोबरच त्यांनी क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे आयोजित 17 वर्षांखालील सालसेत तालुका पातळीवर हॉकी स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले. विजेत्या संघाकडून स्विझल व चेल्सीया यांनी गोल नोंदवले. हा सामना दवर्ली येथील मैदानावर खेळविण्यात आला होता.