शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 22:55 IST

समितीने तरुणांना लोकतंत्र आणि लोकशाही प्रक्रीयेत सहभाग घेण्याची समानसंधी मिळावी अशी मागणी संसदीय समितीने सरकारला केली आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा-विधानसभा निवडणूक (Election) लढवण्याठी स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी एका आनंदाची बातमी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचे किमान वय कमी करण्याची शिफारस ससंदीय समितीने (Parliamentary Panel) केली आहे. समितीने तरुणांना लोकतंत्र आणि लोकशाही प्रक्रीयेत सहभाग घेण्याची समानसंधी मिळावी अशी मागणी संसदीय समितीने सरकारला केली आहे. 

सध्याच्या कायदेशीर नियमानुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 25 वर्षे असणे आवश्यक आहे. तर राज्यसभा आणि राज्य विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्ष इतकी आहे. दरम्यान, आता संसदीय समितीने निवडणूक लढवण्याची किमान वयोमर्यादा 25 आहे, ती 18 वर्ष  (Reducing Age) करावी अशी शिफारस केली आहे.  याकरीता समितीने कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांची उदाहरणे दिली आहेत. 

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार समितीने म्हटले आहे की, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांतील राजकीय स्थितीचा अभ्यास  केल्यानंतर राष्ट्रीय निवडणुकांच्या उमेदवारीसाठी किमान वयोमान 18 वर्षे असायला पाहिजे. या देशातील तरुण विश्वासार्ह आणि जबाबदार राजकीय नेते बनले आहेत. दरम्यान, सुशील मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने विधानसभेच्या निवडणूकांसाठी किमान वय घटवण्याची शिफारस केली आहे. निवडणूक लढविण्याचे किमान वय कमी केल्याने युवकांना लोकतंत्रात सामील होण्याची संधी मिळेल. 

समितीने आपल्या अहवालात जागतिक पातळीवर युवकांना राजकीय क्षेत्राविषयी गोडी वाढत आहे. त्याचा आपणही फायदा घ्यायला हवा असे समितीने म्हटले आहे. तसेच, तरुणांचा राजकारणात सहभाग वाढण्यासाठी त्यांना संसदीय लोकशाही प्रणालीचे आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्यासाठी व्यापक प्रशिक्षण देण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे, यासाठी फिनलॅंडचे नागरिक शिक्षणाच्या यशस्वी मॉडेलाचा आदर्श घ्यावा असेही संसदीय समितीने म्हटले आहे.

दरम्यान, निवडणूक लढवण्याचे वय कमी करण्याच्या मागणीला निवडणूक आयोगाने मात्र रेड सिग्नल दाखविला आहे. निवडणूक आयोगाच्या निरीक्षणानुसार लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी सांभाळण्यासाठी 18 वर्षांच्या मुलाकडे आवश्यक अनुभव आणि परिपक्वता असण्याची अपेक्षा करणे अवास्तव आहे. त्यामुळे सध्याची वयोमर्यादा योग्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.  

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा