शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे मातरम’, ‘जय हिंद’ घोषणा नको, सचिवालयाचे खासदारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:21 IST

Parliament Winter Session 2023: सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी, राज्यसभा सचिवालयाने खासदारांना संसदीय प्रथा, परंपरा आणि आचारसंहितेचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

नवी दिल्ली -  सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी, राज्यसभा सचिवालयाने खासदारांना संसदीय प्रथा, परंपरा आणि आचारसंहितेचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखावी, राज्यसभेच्या अध्यक्षांच्या मंजुरीपूर्वी महत्त्वाचे विषय उपस्थित करण्यासंबंधीच्या सूचना प्रसिद्ध करू नयेत, असे आवाहन केले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होत असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत १५ बैठका होणार असून, त्यात काही महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊ शकते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर लगेचच सुरू होणारे संसदेचे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

सचिवालयानुसार, कामकाजाचे गांभीर्य पाळावे आणि सभागृहात ‘धन्यवाद’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’ किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी करू नये. सभागृहात अध्यक्षांनी केलेल्या आदेशाचे पालन केले जावे. सभागृहात किंवा बाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

आवाहन काय? - प्रत्येक सदस्याने सभागृहात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना अध्यक्षांना नमस्कार करावा.- प्रत्येक सदस्याने कामकाजात व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीने सभागृहात प्रवेश करावा.- सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल या प्रकारे सदस्यांनी आपापसात बोलू नये. - सदस्यांनी भाषण संपल्यानंतर लगेच सभागृहाबाहेर पडू नये.- विषय मांडण्यासाठी दिलेली नोटीस कोणत्याही सदस्याने मान्य होईपर्यंत प्रसिद्ध करू नये.

सर्वपक्षीय बैठकीचे शनिवारी आयोजनअधिवेशनापूर्वी सरकारने शनिवारी (दि. २) लोकसभा व राज्यसभेतील विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशनात, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील ‘पैशासाठी प्रश्न विचारल्या’च्या आरोपांबाबतचा नैतिकता समितीचा अहवाल लोकसभेत मांडला जाणार आहे.

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा