शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कंपन्या धोक्यात, संसदेत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 16:37 IST

लोकसभेत आज यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्लीः लोकसभेत आज यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रायबरेली या मतदारसंघासह रेल्वेच्या 6 युनिट्सच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. रायबरेलीतल्या कोच फॅक्ट्रीचं खासगीकरण केलं जातंय. ही देशाची अमूल्य संपत्ती कवडीमोल दरानं खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशानं हजारो लोक बेरोजगार होणार आहेत.मोदींना उद्देशून त्या म्हणाल्या, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक उद्योगांना देशाच्या विकासाची पूंजी समजत होते. मला सांगताना अतीव दुःख होत आहे की, मोदी सरकार मजूर आणि गरीब लोकांना विसरून फक्त काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी काम करत आहे. मजुरांचं हक्क हिसकावून घेत कशा प्रकारे उद्योगपतींना लाभ पोहोचवला जात आहे हे सर्वश्रुत आहे. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमावरूनही सोनियांनी लक्ष्य करत मोदींवर निशाणा साधला. सरकारनं रेल्वेचं वेगळं बजेट मांडण्याची परंपरा कशासाठी बंद केली ते मला माहीत नाही.एचएएल, बीएसएनएल आणि एमटीएनएलबरोबर काय होतंय हे लपून राहिलेलं नाही. सरकारनं रायबरेलीतली मॉडर्न कोच फॅक्ट्री आणि सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे. मजूर आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रति आदर ठेवण्याचीही गरज आहे. सोनियांनी जेव्हा मोदींवर उद्योगपतींना फायदा पोहोचवण्याच आरोप केला, तेव्हा इतर काँग्रेस खासदारांनी बाकं वाजवून त्यांना अनुमोदन दिलं. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी