शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचा होता प्लॅन A आणि B; मास्टरमाइंड ललितचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 16:25 IST

महेश आणि कैलाश गुरुग्राममध्ये विशाल शर्मा उर्फ ​​विक्कीच्या घरी पोहोचू शकले नाहीत, जिथे संपूर्ण ग्रुप राहत होता.

संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होत आहेत. या संदर्भात, मुख्य आरोपी ललित झा याने गुरूवारी रात्री पोलीस ठाण्यात सरेंडर केलं आहे. ललितने पोलिसांना सांगितले की, घुसखोरीचा त्यांचा मुख्य प्लॅन फसला, तर त्याच्याकडे प्लॅन बीही होता. झा यांनी सांगितलं की, काही कारणास्तव प्लॅन ए नुसार, नीलम आणि अमोल यांना संसद भवनाजवळ जायचं होतं, जर ते त्यात अयशस्वी झाले तर महेश आणि कैलाश दुसर्‍या बाजूने संसदेकडे जातील आणि नंतर संसदेसमोर स्मोक क्रॅकर्सचा वापर करत घोषणाबाजी करतील. 

महेश आणि कैलाश गुरुग्राममध्ये विशाल शर्मा उर्फ ​​विक्कीच्या घरी पोहोचू शकले नाहीत, जिथे संपूर्ण ग्रुप राहत होता. त्यामुळे अमोल आणि नीलम यांना संसदेबाहेरील कामकाज कोणत्याही किंमतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 2001 च्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली, पिवळा स्प्रे फवारला आणि घोषणाबाजी केली, परंतु नंतर त्यांना पकडण्यात आलं. 

खासदार आणि सुरक्षा दलांनी त्यांना पकडलं त्याच वेळी अमोल आणि नीलम यांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत निषेध केला. आरोपींच्या संपूर्ण गटाने प्लॅन A यशस्वी केला. या घटनेनंतर ललितने लपण्याचा कटही रचला होता. या योजनेनुसार ललितला राजस्थानमध्ये अज्ञातवासात जाण्यास मदत करण्याची जबाबदारी महेशवर देण्यात आली होती. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महेशने त्याचे ओळखपत्र वापरून ललितच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि ललित, महेश आणि कैलाश  सतत माहिती गोळा करत होते.मात्र, ललित आणि महेश यांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाणे गाठून सरेंडर केलं. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आझाद, विकी आणि विकीची पत्नी, महेश, कैलाश, ललित झा आणि अमोल शर्मा यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभा