शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Parliament Live: लोकसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित; कारण काय? २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 12:23 IST

हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरला सुरुवात झाली होती. कामकाज हे २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते.

चीनमध्ये कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. देशात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पंतप्रधान मोदींपासून, आरोग्य मंत्री, निती आयोग, आरोग्य सचिव आदींनी कोरोनाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. असे असताना आज अचानक लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. 

महत्वाचे म्हणजे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज हे २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते. म्हणजे आजचा दिवस पकडून पाच दिवस कामकाज चालणार होते. परंतू, पाच दिवस आधीच कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात येणार आहे. आज संसदेचे कामकाज संपणार आहे. 

हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरला सुरुवात झाली होती. आजच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत ३४ गैर सरकारी सदस्यांच्या विधेयकांवर विचार केला जाणार आहे. तसेच लोकसभेत देखील काही विधेयकांवर कार्यवाही केली जाणार आहे. 

पीआरएस लेजिस्लेटिव रिसर्चनुसार बुधवारपर्यंत लोकसभेची उत्पादकता १०३ टक्के आणि राज्यसभेची उत्पादकता १०० टक्के होती. या काळात एकूण ६२ तास आणि ४२ मिनिटे १३ बैठका झाल्या. 

कोरोनावर पंतप्रधान म्हणाले...कमजोर आणि वृद्धांसाठी बूस्टर डोसला प्रोत्साहन द्यावे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा. सणासुदीच्या काळात गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. राज्यांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित सुविधा द्याव्या. कोरोना महामारी अजून संपलेली नाही. विमानतळांवर देखरेख ठेवण्याच्या उपाययोजना मजबूत करा. राज्यांनीही ऑक्सिजन पुरवठा व इतर बाबतीत सज्ज राहावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

टॅग्स :Parliamentसंसदcorona virusकोरोना वायरस बातम्याlok sabhaलोकसभा