शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संसदेतील घुसखोरी गंभीर : पंतप्रधान; म्हणाले, चौकशी सुरू, जास्त चर्चा नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:13 IST

घुसखोरीच्या घटनेचे गांभीर्य कमी केले जाऊ नये. लोकसभा अध्यक्ष सर्व आवश्यक पावले उचलत आहेत - मोदी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मागील आठवड्यात संसदेत झालेली घुसखोरीची घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामागे कोणते घटक आहे, घुसखोरांचे उद्दिष्ट काय आहे, हे शोधणे महत्त्वाचे आहे. सखोल तपास सुरू असून त्यावर चर्चा, वादविवाद करण्याची गरज नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

 घुसखोरीच्या घटनेचे गांभीर्य कमी केले जाऊ नये. लोकसभा अध्यक्ष सर्व आवश्यक पावले उचलत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी ‘दैनिक जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. लोकसभेत मागील बुधवारी प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारत घोषणबाजी केली, तसेच स्मोक क्रॅकर फोडत रंगीत धूरही केला. त्यांच्या घुसखोरीचा उद्देश मणिपूर हिंसाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधणे हा होता, असे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी जप्त केले फोनचे तुकडेसंसदेतील घुसखोरीप्रकरणी चार दिवसांनी दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या नागौरमधून काही तुटलेल्या आणि जळालेल्या मोबाइल फोन्सचे तुकडे जप्त केले आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.पोलिसांनी आरोपींविरुद्धच्या एफआयआरमध्ये पुरावे नष्ट करण्याशी संबंधित भारतीय दंड संहितेची कलमे जोडली आहेत. अटक केलेल्या सहा जणांपैकी एक ललित झा याच्या सांगण्यावरून शनिवारी मोबाइल फोनचे काही तुकडे जप्त करण्यात आले.अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने शनिवारी झा याला राजस्थानमधील नागौर येथे नेले. तिथे तो आरोपी महेश कुमावतच्या मदतीने राहिला होता. या प्रकरणाशी संबंधित तांत्रिक पुरावे लपवण्यासाठी झा आणि कुमावत याने जाणूनबुजून मोबाइल फोन नष्ट केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी