शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे हिवाळी अधिवेशन होत नाही, विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:06 IST

संसदेचे हिवाळी अधिवेशन सरकार बोलावत नसल्यामुळे सरकारविरोधात विरोधी पक्ष आक्रमक भूमिकेच्या तयारीत आहेत.

ठळक मुद्देलोकशाहीत संसदेशिवाय दुसरे अन्य व्यासपीठ मोठे नाही. नेमके सरकार त्याबद्दलच गंभीर नाही याचा अर्थच असा आहे की, सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, असे आझाद म्हणाले.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शक्य : सरकारविरोधात राष्ट्रपतींना देणार निवेदनशीलेश शर्मानवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सरकार बोलावत नसल्यामुळे सरकारविरोधात विरोधी पक्ष आक्रमक भूमिकेच्या तयारीत आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपेतर पक्षांशी संपर्क साधून एकत्रित रणनीती आखून राष्ट्रपतींकडे दाद मागायच्या योजनेवर विचारमंथन होत आहे. त्यामुळे सरकारवर अधिवेशन बोलावण्याचे दडपण वाढवता येईल. दरम्यान, विरोधकांनी आणलेल्या जोरदार दडपणामुळे मोदी सरकार संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात घेण्याची शक्यता आहे.विरोधकांची योजना अशी आहे की, सगळ्या पक्षांनी संसद भवन परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी आपला विरोध व्यक्त करून राष्ट्रपती भवनकडे मोर्चा न्यावा आणि राष्ट्रपतींना निवेदन देऊन अधिवेशन बोलावण्याची मागणी करावी.आतापर्यंत गुलाम नबी आझाद यांनी समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, बहुजन समाज पक्षाचे सतीश मिश्र, डाव्या पक्षांचे सीताराम येचुरी, डी. राजा, जनता दलचे (संयुक्त) शरद यादव आदींशी संपर्क साधला आहे. त्यांचा हेतू द्रमुक, बिजू जनता दल, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनल कॉन्फरन्ससह इतर छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा आहे. आझाद म्हणाले की, भारताच्या इतिहासात असे कधी झाले नाही की, एका राज्याच्या निवडणुकीसाठी संसदेच्या अधिवेशनाकडे दुर्लक्ष करावे. सरकार संसदेच्या अधिवेशनाला गांभीर्याने न घेण्याचा हा पहिला प्रसंग आहे. लोकशाहीत संसदेशिवाय दुसरे अन्य व्यासपीठ मोठे नाही. नेमके सरकार त्याबद्दलच गंभीर नाही याचा अर्थच असा आहे की, सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, असे आझाद म्हणाले.तिकडे काँग्रेसचे मनीष तिवारी यांनीही सरकारवर थेट हल्ला करताना गुजरात विधानसभा निवडणुकीत आपल्या घसरणाºया कामगिरीने घाबरलेले मोदी सरकार संसदेचे अधिवेशन बोलवायला घाबरत आहे, असा आरोप केला. ते म्हणाले, कारण सरकारला माहीत आहे की नोटाबंदी, वस्तू आणि सेवा करापासून भ्रष्टाचाराची प्रकरणे संसदेत उघड होतील व त्यांचा थेट परिणाम गुजरातच्या निवडणुकीवर पडेल. संसदेचे अधिवेशन न बोलावण्याच्या मुद्यावरदेखील विरोधक आता इतर मुद्यांबरोबरच सरकारला झोडपून काढतील, असे सूत्रांनी सांगितले. माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिवेशनाच्या तारखा निश्चित करण्यासाठी संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समितीची बैठक गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर रोजी होत आहे. हिवाळी अधिवेशन कधी घेतले जाईल याचे संकेतदेखील सरकार देत नसल्यामुळे परिस्थिती तणावाची बनली आहे. सामान्यत: अधिवेशन २२ नोव्हेंबरपासून पुढे घेतले जायचे. ते आता डिसेंबरमध्येच सुरू होईल. दोन टप्प्यांतील गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार १२ डिसेंबर रोजी संपेल. त्यामुळे सरकार अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही घेऊ शकते. पहिल्या टप्प्यातील प्रचार ७ डिसेंबर रोजी संपल्यानंतरही लगेच अधिवेशन सुरू होऊ शकते.