शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"जर जनतेनं घोषणाबाजीसाठीच पाठवलं असेल, तर हेच करा अथवा..."; लोकसभाध्यक्ष भडकले, खासदारांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:30 IST

आज संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली. ते सरकारकडे महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा जारी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, या गदारोळावरून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी गदारोळ करणाऱ्या खासदारांना सुनावले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज (सोमवार) संसदेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. गेल्या काही दिवसांपूर्वी माहुकंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक दिसत आहेत. आज संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली. ते सरकारकडे महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा जारी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, या गदारोळावरून लोकसभाध्यक्षओम बिर्ला यांनी गदारोळ करणाऱ्या खासदारांना सुनावले.

सभागृहात गोषणाबाजी - अर्थसंकल्पाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधकांनी सरकारकडे महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात उत्तर देण्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांवर भडकले आणि "जर जनतेने घोषणाबाजी करण्यासाठीच पाठवले असेल, तर हेच करावे अथवा कामकाच चालू द्यावे," अशा शब्दांत सुनावले.

काय म्हणाले ओम बिर्ला? -घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांना लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "या मुद्द्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केला होता. आपण अभिभाषणावरील चर्चेदरम्यान हा विषय मांडू शकला असता. मात्र, प्रश्नोत्तराचा काळ हा महत्वाचा असतो. यात सरकारची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते." यावेळी बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. 

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी -लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "जर देशातील जनतेने आपल्याला घोषणा देण्यासाठी पाठवले असेल, तर ते करा आणि जर तुम्हाला सभागृह चालवायचे असेल, तर आपापल्या जागेवर बसा." यावेळी महाकुंभ मेळ्यात जालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात विरोदी पक्षाच्या सदस्यांनी 'प्रधानमंत्री जवाब दो' आणि 'मोदी सरकार शेम शेम' अशी घोषणाबाजीही केली. तत्पूर्वी, मौनी अवमस्येला प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 30 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, यासंदर्भात सरकारने मृतांचा खरा आकडा सांगितला नाही, असा आरोप काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून केला जात आहे.

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाParliamentसंसद