शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित १४६ खासदार परतणार? सर्वपक्षीय बैठकीत हाेणार चर्चा, सरकार प्रस्ताव आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 07:25 IST

Parliament Budget Session 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान १४६ खासदारांचे निलंबन केले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनादरम्यान सरकारकडून खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो.

- संजय शर्मा नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान १४६ खासदारांचे निलंबन केले होते. संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनादरम्यान सरकारकडून खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. अधिवेशनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान बोलावण्यात आले आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लेखानुदान सादर करणार आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या १४६ खासदारांचा मुद्दा उपस्थित करण्याची विरोधकांची रणनीती पाहता केंद्र सरकारच खासदारांचे निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव विरोधकांसमोर ठेवू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- लाेकसभेतील १०० तर राज्यसभेतील ४६ सदस्य निलंबित करण्यात आले हाेते. - संसदेत १३ डिसेंबर राेजी संसदेत घुसखाेरी झाल्यानंतर प्रचंड गदाराेळ घालण्यात आला हाेता.- काही खासदार पीठासीन अधिकाऱ्यांच्या खूर्चीपर्यंत पाेहाेचले हाेते. - ११ राज्यसभेतील व ३ लाेकसभा सदस्यांचे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठविण्यात आले हाेते.

तीन सदस्यांचे निलंबन रद्द करण्याचा ठरावलाेकसभेच्या हक्कभंग समितीसमाेर काँग्रेसचे तीन सदस्य के. जयकुमार, अब्दुल खलिक आणि विजय वसंत यांची दोन आठवड्यांपूर्वी सुनावणी झाली हाेती. त्यावेळी त्यांनी सभागृहातील वर्तनाबद्दल समितीसमाेर माफी मागितली. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव समितीने मंजूर केला हाेता. तो लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

बैठकीत काय हाेणार?सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ३० जानेवारी रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. प्रत्येक सत्रापूर्वी होणारी ही एक प्रकारची पारंपरिक बैठक आहे. या बैठकीत विविध पक्षांचे नेते ते मुद्दे मांडतात जे ते संसदेत मांडू इच्छितात व सरकार त्यांना आपल्या अजेंड्याची माहिती देऊन सहकार्याचे आवाहन करते.

संसदेची सुरक्षा  ‘सीआयएसएफ’ करणार संसदेच्या मागील अधिवेशनात संसदेत घुसखोरी झाल्यानंतर आता ‘सीआयएसएफ’ने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. या त्रिस्तरीय सुरक्षेमध्ये बाहेरील सुरक्षा दिल्ली पोलिस, संसदेच्या सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’ आणि संसद सुरक्षारक्षक आत उपस्थित असतील. संसदेच्या सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’ची अग्निशमन शाखाही तैनात करण्यात येणार आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा तपासणी, संपूर्ण बॉडी स्कॅनिंग, पर्स, मोबाइल, बेल्ट, शूजची तपासणी केली जाईल. 

टॅग्स :ParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनCentral Governmentकेंद्र सरकार