शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

‘ताज’जवळील पार्किंग; ‘जैसे थे’चे आदेश, पूर्वीच्या आदेशाला दिली स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:18 IST

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ताजमहालजवळील बांधकाम सुरू असलेली बहुमजली कार पार्किंग पाडण्याच्या आपल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली.

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ताजमहालजवळील बांधकाम सुरू असलेली बहुमजली कार पार्किंग पाडण्याच्या आपल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ताज ट्रेपेजियम झोनच्या संरक्षण आणि प्रदूषणाबाबत सर्वसमावेशक धोरण सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने बहुमजली कार पार्किंग ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले.या ठिकाणी यापुढे कोणतेही नवे काम करू नये, असे निर्देशही दिले. या बहुमजली पार्किं गचे बांधकाम ताजमहालच्या पूर्वेच्या दरवाजापासून एक कि.मी. अंतरावर करण्यात येत आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, या भागात हॉटेल कसे काय बांधले जाऊ शकते.तथापि, या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ताजमहालच्या संरक्षणासाठी धोरण आखण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. ताजमहालला प्रदूषणापासून संरक्षण देण्यासाठी ताजच्या भोवतालचा १०,४०० वर्ग कि.मी.चा भाग ताज ट्रेपेजियम झोन आहे.>संरक्षणासाठी काय धोरण?न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली की, आपण आम्हाला सांगावे की, ताजमहालच्या संरक्षणासाठी आपले काय धोरण आहे? जर आपल्याकडे असे धोरण असेल, तर आम्ही ते पाहू शकतो काय? यावर मेहता यांनी सांगितले की, आमच्याकडे यावर विस्तृत धोरण आहे. ते न्यायालयापुढे सादर करण्यात येईल. पार्किंग स्थळ पाडण्याबाबतच्या यापूर्वीच्या २४ आॅक्टोबरच्या आदेशाचा मेहता यांनी उल्लेख केला असता न्यायालयाने सांगितले की, आम्ही ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवू; पण यात आणखी बांधकामाची परवानगी मिळणार नाही.

टॅग्स :Taj Mahalताजमहाल