शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'तुमचे पालक चुकीचं काम करत नाहीत ना?'; सरकारचा विद्यार्थ्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 09:25 IST

खासगी आणि आक्षेपार्ह प्रश्नांमुळे सरकारवर टीकेची झोड

गुरुग्राम: खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना हरियाणा सरकारकडून देण्यात आलेल्या अर्जामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तुमच्या पालकांना काही आनुवांशिक आजार आहेत का?, तुमचे पालक चुकीच्या मार्गानं पैसा कमावतात का?, अशा प्रश्नांचा समावेश या अर्जात करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी हरियाणा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकारकडून खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज देण्यात आले आहेत. या अर्जाच्या माध्यमातून आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, धर्म, उत्पन्न आणि बँक खात्यांचा तपशील अशी माहिती मागवण्यात आली आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. 'विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरकार त्यांच्या पालकांची अत्यंत खासगी माहिती गोळा करत आहे. हा सर्व प्रकार अतिशय असंवेदनशील आहे. पालकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत चुकीचा आहे का?, असा प्रश्न विचारणं अतिशय धक्कादायक आहे,' असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. हरयाणा सरकारनं मात्र अर्जातून मागवलेल्या माहितीचं समर्थन केलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठीच विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा केली जात असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. हरियाणातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा अर्ज भरुन घेतला जातो, असे राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडूनही हा अर्ज भरुन घेतला जात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात खासगी शाळांनी मात्र हात वर केले आहेत. राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं अर्ज तयार केला असून संपूर्ण माहिती शाळा प्रशासनाला नव्हे, तर सरकारला हवी आहे, असं अनेक शाळांनी पालकांना सांगितलं आहे. अर्जातील काही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्यांची उत्तरं भरु नका, असं अनेक शाळांच्या व्यवस्थापनानं पालकांना सुचवलं आहे. 'तुमचे पालक चुकीच्या मार्गानं पैसे कमवत नाही का?, यासारख्या अनेक प्रश्नांवर पालकांना आक्षेप आहे. त्यामुळे अर्जातील असे प्रश्न तसेच सोडून द्या, असं आम्ही पालकांना सांगितलं आहे,' अशी माहिती दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अदिती मिश्रा यांनी यांनी दिली. 

टॅग्स :Haryanaहरयाणा