शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित मुलींचे पालकांनी करावे भरणपोषण, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 07:52 IST

नईमुल्ला शेख आणि अन्य एकाने घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

प्रयागराज : धर्म किंवा वय विचारात न घेता अविवाहित मुलीला घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत  पालकांकडून भरणपोषण मिळविण्याचा अधिकार आहे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला.

नईमुल्ला शेख आणि अन्य एकाने घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. तीन मुलींच्या पालकांनी त्यांना पालनपोषण देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. तिन्ही मुलींनी त्यांचे वडील आणि सावत्र आई यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करीत याचिका दाखल केली होती. 

वडिलांचा दावा काय होता?कनिष्ठ न्यायालयाने या मुलींचे वडील वृद्ध आणि अशक्त व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, तसेच ते आधीपासूनच त्यांचे संगोपन करीत आले आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेतली नाही. घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत भरणपोषणासाठी अर्ज त्यांच्या चुलत भावाच्या वतीने करण्यात आला आहे.

पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुली त्यांच्यासोबत राहत असून, त्यांचा खर्च ते स्वत: उचलत आहेत. आपल्या मुली शिकलेल्या आहेत आणि शिकवणी घेऊन कमाई करीत आहेत. त्यांच्या मुली प्रौढ असल्यामुळे त्यांना देखभालीचा दावा करता येत नाही.

अविवाहित मुलीला, मग ती हिंदू असो वा मुस्लीम, तिला तिच्या वयाचा विचार न करता, भरणपोषण मिळण्याचा अधिकार आहे यात शंका नाही. हा मुद्दा केवळ देखभालीशी संबंधित नसताना, पीडितेला घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम २० अंतर्गत स्वतंत्र अधिकार आहेत, असे निरीक्षण न्या. ज्योत्स्ना शर्मा यांनी नोंदविले.

टॅग्स :Courtन्यायालय