शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात मुलाचा जीव गेला; आई-वडिलांनी खड्डे बुजविण्याचा वसाच घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:01 IST

रस्त्यावर पडत असलेल्या खड्ड्यांमधल्या अपघातात अनेक आईवडिलांनी आपल्या तरुण मुलांना गमावलं आहे.

ठळक मुद्देस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुलाला गमावलेल्या आईवडिलांनी एक अनोखंच अभियान सुरू केलं आहे. रस्ते अपघातात आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मनोज वाधवा यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं अनोखं अभियान सुरू केलं आहे.राष्ट्रीय राजमार्गावर बाटा चौकजवळच्या रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे सहा वर्षांपूर्वी 10 फेब्रुवारी 2014ला मनोज वाधवा यांनी आपल्या तीन वर्षांचा मुलगा पवित्रला गमावलं.

नवी दिल्लीः रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण वाचल्याच असतील. रस्त्यावर पडत असलेल्या खड्ड्यांमधल्या अपघातात अनेक आईवडिलांनी आपल्या तरुण मुलांना गमावलं आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुलाला गमावलेल्या आईवडिलांनी एक अनोखंच अभियान सुरू केलं आहे. रस्ते अपघातात आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मनोज वाधवा यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं अनोखं अभियान सुरू केलं आहे.नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय राजमार्गावर बाटा चौकजवळच्या रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे सहा वर्षांपूर्वी 10 फेब्रुवारी 2014ला मनोज वाधवा यांनी आपल्या तीन वर्षांचा मुलगा पवित्रला गमावलं. या अपघातप्रकरणी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दोषी धरलेलं असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत. सोमवरी मनोज आणि त्यांची पत्नी टीना त्याच बाटा चौक या ठिकाणी पोहोचले जिथे त्यांनी आपल्या मुलाला गमावलं होतं. मनोज आणि त्यांची पत्नी रस्त्यांच्या कडेवरचे खड्डे भरताना दिसत आहेत.  मनोज वाधवा हे 10 फेब्रुवारी 2014ला पत्नी टीना आणि 3 वर्षांचा मुलगा पवित्रबरोबर स्कूटरवरून बाटा रस्त्यावर आले असता त्याचदरम्यान पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात त्यांची स्कूटर गेली अन् त्यांचा स्कूटरवरील ताबा सुटला. या दुर्घटनेत मुलगा पवित्रला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर पडलेल्या टीना यांच्या पायावरूनही एक अज्ञात वाहन गेलं. तसेच या अपघातात मुलगा पवित्रचा मृत्यू झाला. तसेच पत्नी टीना हिचे आतापर्यंत 23 ऑपरेशन झाले आहेत. मनोज वाधवा यांनी सांगितलं की, रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांना महापालिका, राजमार्ग प्राधिकरण, हरियाणा शहर विकास प्राधिकरणाच्या अधिकारी जबाबदार आहेत.