नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने वयोवृद्ध ननवरील बलात्कार, तसेच हिस्सार येथील निर्माणाधीन चर्चच्या तोडफोडप्रकरणी बुधवारी पश्चिम बंगाल व हरियाणा सरकारला नोटीस बजावली असून सविस्तर अहवाल मागितला आहे.आयोगाने येथे जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार प. बंगालचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना नोटीस बजावून दोन आठवड्यांच्या आत ननवरील बलात्काराच्या घटनेची सविस्तर माहिती मागितली आहे. माध्यमांमध्ये प्रकाशित वृत्ताच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन याचा तपास सीबीआयला सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
प. बंगाल, हरियाणा सरकारला नोटीस
By admin | Updated: March 18, 2015 23:51 IST