शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची 'मन की बात' आता शब्द रूपातही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 14:21 IST

मुंबई, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर महिना अखेरला प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रम आता शब्द रुपात उपलब्ध झाला आहेकाल शनिवारी मुंबईतील राजभवनात मन की बात या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला राज्यपाल सी ...

मुंबई, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर महिना अखेरला प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रम आता शब्द रुपात उपलब्ध झाला आहेकाल शनिवारी मुंबईतील राजभवनात मन की बात या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनचे संस्थापक संचालक हितेश जैन आदी उपस्थित होते. देशातील सर्वात जुनं मात्र आजही प्रभावी असलेल्या रेडिओ या माध्यमाद्वारे या उपक्रमाची सुरूवात झाली असली तरी आज टिव्ही, मोबाईल, इंटरनेट या सर्व माध्यमांवर मन की बात उपलब्ध आहे.स्वातंत्र्य सैनिकांनी रेडिओच्या माध्यमाचा वापर जनतेपर्यंत विचार पोहोचविण्यासाठी केला होता. आज दूरचित्रवाणी क्रांतीप्रमाणेच प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी रेडिओसारखे माध्यम वापरुन 'मन की बात' द्वारे शिक्षण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत, बेटी बचाओ अभियान, महिला सक्षमीकरण आदी अनेक क्षेत्रात लोकांच्याच कल्पनांना आकार देत लोकसहभागाचा अद्वितीय संवाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला आहे, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केले.मोदींच्या काही क्रांतिकारी कल्पनांनी लोकांच्या मनात, विशेषतः मुले आणि युवकांच्या मनावर सामाजिक कार्य करण्यासाठी खोल परिणाम केला आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, मन की बातच्या माध्यमातून मोदींनी लावलेले क्रांतिचे बीज येत्या कालावधीत फळ देईल. यासाठी केंद्र व राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे आणि कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) यांना समाजहिताच्या कामात गुंतवावे लागेल आणि बांधिलकीने काम करावे लागेल. यावेळी राज्यपालांनी राजभवनची इमारत दिव्यांग-सुलभ बनविण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानुसार राजभवनमधील इमारतींमध्ये दिव्यांगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प बनविण्यात येणार आहे.प्रधानमंत्री मोदी हे समाजाला प्रेरित करू शकतात ही त्यांना मोठी देणगी आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजात चांगले काम करण्याची इच्छा असलेले अनेक लोक आहेत; मात्र त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. प्रधानमंत्र्यांनी 'मन की बात' द्वारे लाखो लोकांना प्रेरित करण्याचे काम केले. 'मन की बात' हे केवळ प्रधानमंत्र्यांच्या मनातील विचार नसून सर्वसामान्यांच्या मनातील विचार आहेत. 'मन की बात' पूर्ण भारताला संमोहित करतेच; मात्र आगामी काळात संवाद मुत्सद्दी असणाऱ्या व्यक्तींनाही आपली संवादाची दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन करणारी आहे.