मुजफ्फरनगर : जीन्स घालणो व मोबाईल वापरणो यामुळे मुलींवर वाईट परिणाम होत असल्याचे सांगून, येथील एका सामुदायिक पंचायतीने मुलींच्या जीन्स घालण्यावर व मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. या दोन्ही गोष्टींमुळे छेड काढण्याच्या घटना वाढत असल्याचे या पंचायतीचे मत आहे. गुजर्र समाजाची ही पंचायत काल जाडवाड गावात भरविण्यात आली होती.त्यात अविवाहित मुलींनी जीन्स घालणो व मोबाईलचा वापर करणो यावर बंदी घातली गेली. मुलींनी आक्षेपार्ह कपडे घातल्याने त्यांच्यासोबत विनयभंगाची प्रकरणो वाढत असल्याचा या पंचायतीने यावेळी दावा केला. याचसोबत लग्नसमारंभात डीजे वाजवू नये, असेही आवाहन पंचायतीने केले आहे. उत्तर प्रदेश व हरियाणातील खाप पंचायतींनी याआधीही केलेल्या अशा निर्णयांवर टीकेची झोड उठली होती.
मुलींच्या जीन्सवर पंचायतीची बंदी
By admin | Updated: August 10, 2014 03:23 IST