शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पणजी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विजयी; तर वाळपईतून विश्वजीत राणे यांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 13:40 IST

पणजी  मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा विजय झाला आहे.

ठळक मुद्देपणजी  मतदारसंघातील पोटनिवडणुकीत  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा विजय झाला आहे.आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झाले आहे. मनोहर पर्रीकर यांनी 4 हजार 803 मतांनी निवडणूक जिंकली.

पणजी, दि. 28- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. पर्रीकर चार हजार ८०३ तर राणे १० हजार ०८७ मतांनी विजयी झाले. कॉंग्रेसचे पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना ५ हजार ०५९ तर काँग्रेसचे वाळपईतील उमेदवार रॉय नाईक यांना केवळ ६ हजार १०१ मते मिळाली. गोवा मनोरंजन सोसायटीच्या इमारतीत सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या फेरीनंतरच पणजीचे पत्ते स्पष्ट झाले होते. पहिल्या फेरीची मतमोजणी संपली तेव्हा पर्रीकर ४ हजार २९० मते घेतली होती. ते २ हजार ०३३ मतांनी आघाडीवर होते. चोडणकर २ हजार २५२ मते घेऊन पिछाडीवर होते. पर्रीकरांची आघाडी नंतर प्रत्येक फेरीनंतर वाढत गेली. त्यांना एकूण ९ हजार ८६२ मते मिळाली.

वाळपई मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्याच फेरीनंतर राणे यांनी ३ हजार ८१९ ची आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसचा एक-एक कार्यकर्ता मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेऊ लागला. त्यांना ज्या ऊसगाव पंचायत क्षेत्रातून फार मोठ्या अपेक्षा होत्या तेथेही पदरी निराशाच पडली. या पंचायतक्षेत्रातही राणे यांना मोठी आघाडी मिळाली. मतमोजणी संपली तेव्हा राणे यांच्या खात्यात तब्बल १६ हजार १८८ मते जमा झाली होती.

गोसुमं पुन्हा अपयशीगोवा सुरक्षा मंच ( गोसुमं) या पक्षाला मागील निवडणुकीत जी २९९ मते मिळाली होती तेवढी मतेही यावेळी राखता आली नाहीत. पक्षाचे उमेदवार आनंद शिरोडकर यांना केवळ २२० मते मिळाली. नोटा पर्याय निवडणाºयांची संख्या आहे ३०१. केनेथ सिल्वेरा या अपक्ष उमेदवाराला ९६ मते मिळाली.

पणजीत मला अपेक्षेपेक्षा १३८ मते कमी निवडणूक निकालाने माझ्या आघाडी सरकारच्या स्थिरतेवर लोकांनी शिक्कामोर्तब केले. त्यांमुळे भाजप आघाडी सरकारचे मनोधैर्य वाढले आहे. पणजीत मला अपेक्षेपेक्षा १३८ मते कमी मिळाली, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हंटलं.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी भाजपचा पराभव झाला होता. भाजपला केवळ तेरा जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या. मात्र नंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे संख्याबळ सोळा झाले. शिवाय भाजपचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांनी राजीनामा दिल्याने भाजपचे संख्याबळ बारा झाले होते. आता भाजपचे संख्याबळ चौदा झाले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आणि तीन अपक्ष आमदार असे नऊ बिगरभाजप आमदार घेऊन पर्रीकर यांनी गेल्या मार्चमध्ये आघाडी सरकार स्थापन केले. या सरकारच्या स्थिरतेबाबत काही महिने प्रश्नार्थक चर्चा सुरू होती. पर्रीकर यांचा पराभव झाला असता तर सरकार कोसळले असते. पर्रीकर यांच्या विजयामुळे आता गोवा सरकारच्या स्थिरतेबाबतची साशंकता संपुष्टात आली.