शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पनामा पेपर्सवरून मोदी सरकारवर शरद यादवांनी चढवला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 8:42 PM

भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते. मात्र रविवारी एका ट्विटद्वारे मोदी सरकारवर त्यांनी हल्ला चढवला आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 30 - नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद(यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते. मात्र रविवारी एका ट्विटद्वारे मोदी सरकारवर त्यांनी हल्ला चढवला आहे. मोदी सरकारची हजेरी घेत शरद यादव म्हणतात, ‘पनामा पेपर्समध्ये ज्या भारतीय नावांचा उल्लेख आहे, त्यापैकी एकालाही मोदी सरकारने पकडलेले नाही. परदेशात दडवलेले काळे पैसे परत आणणार ही मोदी सरकारची मुख्य घोषणा होती त्या दिशेने केवळ निवडक कारवाईच आजपर्यंत देशात झाल्याचे चित्र दिसते आहे. शरद यादव पुढे म्हणतात की विविध सेवांच्या नावाखाली जनतेकडून विविध प्रकारचे सेस सरकार वसुल करीत आहे. तथापि या रकमेतून कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाल्याचे चित्र देशात दिसत नाही. असफल ठरलेली पीक विमा योजना याचे ठळक उदाहरण आहे. केवळ खासगी कंपन्यांना नफा मिळवून देण्याची व्यवस्था या योजनेतून झाली आहे’.बिहारमधील महाआघाडीतून जद (यु) ने तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यापासून शरद यादव मनोमन नितीशकुमारांवर नाराज आहेत, याची उघड चर्चा राजधानीत सर्वत्र सुरू आहे. हा निर्णय पक्षाने घेतला त्या दिवशी सायंकाळी दिल्लीत आपल्या निवासस्थानी जद (यु)चे नेते आणि कार्यक र्त्यांची शरद यादवांनी एक बैठकही बोलावली होती. दरम्यान अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीशकुमारांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचे समजले. यानंतर रविवारपर्यंत शरद यादव गप्प होते. विशेषत: नितीशकुमारांच्या विरोधात एक शब्दही ते बोललेले नाहीत, तथापि भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या पक्षाच्या निर्णयाबाबत ते अजूनही अस्वस्थ असावेत असे त्यांच्या देहबोलीवरून जाणवते. शरद यादवांच्या ताज्या मन:स्थितीचा अंदाज घेत शनिवारी शरद यादवांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून लालूप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याचे त्यांना आवाहन केले.व्टीटरवर लालूप्रसाद म्हणाले : देशात गरीब, वंचित व शेतकरी वर्गावर संकट कोसळले आहे. या आपत्तीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक जोरदार आंदोलन उभे करावे लागेल. देशाला पुन्हा एका नव्या संघर्षाची आता गरज आहे, शरदभाई त्यासाठी तुम्ही या. पूर्वीही आपण बरोबर संघर्ष केला आहे. लाठया खाल्ल्या आहेत. पुन्हा एकदा सारे मिळून या दक्षिणपंथी हुकुमशाहीला नेस्तनाबूत करू.भाजपबरोबर नवे सरकार बनवतांना नितीशकुमार सर्वांचे समाधान करू शकलेले नाहीत. साहजिकच बिहारच्या नव्या आघाडीतह सरकारच्या विरोधात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. मंत्र्यांच्या शपथविधीच्या अगोदर माजी मुख्यमंत्री व ‘हम’ पक्षाचे नेते जीतनराम मांझी यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात जाहीरपणे बोलून दाखवली. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षालाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.