पान 2- सेसा
By admin | Updated: August 2, 2015 23:31 IST
‘सेसा’च्या 42
पान 2- सेसा
‘सेसा’च्या 42 कामगारांना ले-ऑफ नोटीस- सुर्ल येथील कंपनीला टाळे- कामगारांचे भवितव्य अधांतरीडिचोली : सुर्ल येथील सेसा रिसोर्सीस कंपनीने 42 कामगारांना ले-ऑफ नोटीस बजावली असून कंपनीच्या गेटला टाळे ठोकल्याने कामगारांचे भवितव्य अधांतरी राहिले आहे.सेसा कंपनी व्यवस्थापनाने 27 जुलै रोजी नोटीस देताना कळविले आहे की, कंपनीने कठीण स्थितीत कसेबसे दिवस काढले. मात्र, आता आर्थिक स्थिती गंभीर असून भविष्यात काम सुरू होणे कठीण व अशक्य असल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.इंडस्ट्रीयल डिस्प्युट अँक्ट 1947 सेक्शन 258, 2/1/1998 नुसार ही नोटीस बजावल्याचे कंपनीने आपल्या पत्रात म्हटले असून 1 ऑगस्टपासून कामगारांनी कामावर येऊ नये, असे सेसा रिसोर्सीसचे एस. सुरेश यांनी या नोटिसीत म्हटले आहे. याच्या प्रति गोवा वेल्फेअर सोसायटी, कामगार संघटना व संबंधित खात्याला पाठवण्यात आल्या आहेत.- कामगारांचे सरपंचांना पत्रया कंपनीच्या कामगारांना गेट बाहेरच रोखल्यानंतर कामगारांनी सुर्लचे सरपंच संजय सुर्लकर यांना लेखी निवेदन देऊन याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली. कामगारांना कमी केल्यास त्यांच्यावर मोठी आपत्ती येण्याची शक्यता असून रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. आपण कंपनी व्यवस्थापनाशी आणि कामगार नेत्यांशी याविषयी चर्चा केली आहे. कामगार संघटना याबाबत कोणता निर्णय घेते, हे पाहून पुढील कृती ठरवण्यात येईल. आपण व्यवस्थापनाकडे हा विषय मांडला असून कामगारांना ऐनवेळी कमी करणे अयोग्य आहे. खाणी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असताना कंपनीने याबाबत विचार करायला हवा, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी संगितले.- मुख्यमंत्र्यांशी चर्चादरम्यान, 1 ऑगस्टपासून कामगारांना कंपनीने कामावर घेऊ नये, अशी नोटीस दिल्यानंतर हा विषय आपण मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कानावर घातला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत दोन दिवसांत संबंधितांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले. डिचोलीत काही दिवसांपूर्वी अनेक कामगारांना कमी करण्यात आले. तसेच स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. आता सुर्ल भागातील कामगारांना कपातीचा निर्णय आल्याने कामगारवर्गात नाराजी पसरली असून बेकारीची कुर्हाड कोसळल्याने कामगारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)बॉक्स- निर्णय अयोग्य : डॉ. प्रमोद सावंतराज्यातील खाण व्यवसाय ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलेला असताना कंपनीने कामगारांना ले-ऑफ करण्याची कृती अयोग्य असल्याची प्रतिक्रिया साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.फोटो ओळी-सुर्ल येथील सेसा कंपनीच्या गेटवर थांबलेले कामगार. (विशांत वझे)