शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पान 2 : फोर्स

By admin | Updated: July 31, 2015 23:55 IST

भारतीय सुरक्षा मंचतर्फे निषेध

भारतीय सुरक्षा मंचतर्फे निषेध
पणजी : ‘डायोसेझन सोसायटी’ व ‘आर्चडायोसेझन बोर्ड ऑफ एज्युकेशन’च्या शाळांतून अधिकृत नोटिसा काढून व पालकांना वेठीस धरून ‘फोर्स’च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून ऐन सकाळी गडबडीच्या वेळी ठिकठिकाणी पालकांना रस्त्यावर उतरवून रहदारीचे मुख्य रस्ते बंद करून गोवाभर जनजीवन विस्कळित करून कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याच्या ‘फोर्स’च्या आणि ‘त्या’ शाळांच्या व्यवस्थापनांच्या आज प्रकट झालेल्या निदंनीय हडेलहप्पीचा भारतीय भाषा सुरक्षा मंच तीव्र निषेध करते. या प्रकाराची पूर्ण चौकशी सरकारने करावी आणि त्यास जबाबदार असणार्‍या शाळांविरुद्ध कडक कारवाई करावी आणि पवित्र शिक्षण क्षेत्रात घुसू पाहणारी ही दुष्प्रवृत्ती वेळीच ठेचून काढावी, अशी भा.भा.सु.म.ची यासंदर्भात मागणी आहे.
आपल्याला हवे तेव्हा हवी ती मागणी गोवा सरकारने याच अधिवेशनात पूर्ण करावी, असे दरडावून आणि त्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे आज केलेल्या कायदा-सुव्यवस्था भंग करणार्‍या सुनियोजित कारस्थानाने दाखवून ‘फोर्स’ने धार्मिक पाठिंब्यावर ते सिद्ध केले आहे, ही शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत चिंताजनक गोष्ट आहे. दमदाटीने सरकारवर दडपण आणण्याचा हा निंदनीय प्रयत्न आहे. असल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवणार्‍या लोकांच्या अशा दडपणांना सरकारने अजिबात भीक घालू नये आणि कोणत्याही असंविधानिक दडपणाला बळी न पडता घटनेच्या चौकटीत बसणारेच निर्णय सर्मथपणे घ्यावेत, असे आवाहन भा.भा.सु.म.तर्फे करण्यात येत आहे, असे सुभाष वेलिंगकर, कृती-विभाग निमंत्रक, भा.भा.सु.म. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.