शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पान १-हार्दिक पटेल एकता यात्रेपूर्वी स्थानबद्ध

By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST

सुरतमध्ये कारवाई: गुजरातेतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद

सुरतमध्ये कारवाई: गुजरातेतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद
अहमदाबाद: पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी सुरु झालेले मोठे आंदोलन दडपण्याचा चंग गुजरातेतील भाजपा सरकारने बांधल्याचे शनिवारी पुरते स्पष्ट झाले. पटेल आरक्षण आंदोलनाचे युवा नेते हार्दिक पटेल यांना पोलिसांनी शनिवारी त्यांच्या ३५ समर्थकांसह स्थानबद्ध केले. त्यानंतर गुजरात सरकारने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासोबत कुठलीही अफवा पसरू नये याची खबरदारी म्हणून राज्यभरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली.
प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय एकता यात्रा काढण्याचा प्रयत्न केल्याचे कारण पटेल यांच्या स्थानबद्धतेसाठी देण्यात आले. सुरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, हार्दिक पटेल यांना शहरातील वरछा क्षेत्रात मंगध चौकात ताब्यात घेण्यात आले. कायदा व्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. कारण या मोर्चात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांची परवानगी घेतली नव्हती.
२२ वर्षीय हार्दिक यांनी पोलीस कारवाईची निंदा केली आहे. दांडी-अहमदाबाद मोर्चाची परवानगी न मिळल्याने त्यांनी एकता रॅलीबाबत कालपर्यंत गोपनीयता बाळगली होती.
अनिश्चित काळासाठी मोबाईल इंटरनेट बंद
कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासोबतच कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत यासाठी संपूर्ण गुजरातमधील मोबाईल इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक पी.सी. ठाकूर यांनी दिली. सुरतमध्ये हार्दिक यांना ताब्यात घेताच पोलिसांनी २४ तास मोबाईल इंटरनेट सेवेवर निर्बंध घालण्याबाबत अधिसूचना काढली. (वृत्तसंस्था)

-------------
पटेलांचा ओबीसीत समावेश करण्यात यावा यासाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले आहे. गेल्या २५ ऑगस्टला हार्दिक यांना अटक केल्यानंतर गुजरातमध्ये हिंसाचार भडकला होता. यात १० जणांचा मृत्यू तर कोट्यवधीच्या संपत्तीचे नुकसान झाले होते.
------------------

कोट
आमचा आवाज चिरडण्याचा गुजरात सरकारचा डाव आहे. त्यांना आमच्यावर अत्याचार करायचे आहेत. राज्यात हिंसाचार माजावा अशी पोलीस आणि सरकारची इच्छा आहे. ही कारवाई लोकशाही भावनेच्या विरोधात आहे.

हार्दिक पटेल
पटेल आरक्षण नेता