शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाकची युद्धाची हिंमत नाही

By admin | Updated: September 30, 2016 01:43 IST

नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधून भारतीय लष्कराने तडाखेबाज उत्तर दिले आहे. तथापि, पाकही दहशतवादी कारवायांचा जोर वाढवून भारतातील

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधून भारतीय लष्कराने तडाखेबाज उत्तर दिले आहे. तथापि, पाकही दहशतवादी कारवायांचा जोर वाढवून भारतातील निवडक शहरे, लष्करी ठिकाणे व इतर प्रमुख ठिकाणांंवर दहशतवादी हल्ला करून पलटवार करू शकतो. कारण भारताशी थेट युद्ध करण्याची पाकिस्तानची तयारी नाही, असे सांगत संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर व्ही. महालिंगम म्हणाले की, आम्हाला सज्ज राहावे लागेल.‘लोकमत’शी बोलताना महालिंगम म्हणाले की, पाकिस्तान पलटवार करू शकतो. सीमापार सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्याआधी भारताने जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पाडला. भारताने यादृष्टीने चांगले राजनैतिक प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, चीन आपल्याच समस्येत गुरफटला आहे. चीनला थेट हस्तक्षेप करण्यासाठी कोणताही आधार नाही. पाकिस्तानला शंभर वेळा विचार करावा लागेल...उरी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या बलिदानाचा बदला घेत भारताने चोख उत्तर दिले आहे, असे ठाम मत लेफ्ट. जनरल आर.एस. कदयाल यांनी व्यक्त केले. पाकिस्तान राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या एवढा दुबळा आहे की, पलटवार करण्याआधी पाकिस्तानला शंभर वेळा विचार करावा लागेल. दोन युद्धांत पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे. तेव्हा तो तिसऱ्यांदा अशी चूक करणार नाही. तथापि, नियंत्रण रेषेलगत २४ तास सतर्क राहावे लागेल. कारण आमच्यासाठी सीमा अधिक संवेदनशील बनली आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तानच्या बाजूने दहशतवादी हल्ला आणि घुसखोरी होऊ शकते. संरक्षणतज्ज्ञ आणि माजी डीजीएमओ विनोद भाटिया म्हणाले की, भारताने निवडक दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. हल्ला केला नाही. ७-८ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आम्हाला यश आले. भारताच्या संरक्षण धोरणात लक्षणीय बदल...पाकिस्तान पलटवार करू शकतो. तथापि, त्याचे स्वरूप कसे असेल, याचा अंदाज बांधणे सोपे नाही. भारताची क्षमता, सामर्थ्य पाकिस्तान जाणून आहे. तेव्हा असे पाऊल उचलण्याआधी पाकिस्तान याबाबत आकलन जरूर करील, असे निवृत्त एअर मार्शल ए. अहलुवालिया म्हणाले. भारताच्या संरक्षण धोरणात लक्षणीय बदल झाला आहे, असे बव्हंशी संरक्षणतज्ज्ञांना वाटते. आजवर भारत राजनैतिक धैर्याचे धोरण अंगीकारत होता. आता तर थेट हल्लाच केला आहे.